नाशिक: सातपूर- अंबडलिंक राेडवरील अतिक्रमित भंगार बाजारावर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने दुसऱ्या दिवशीही धडाकेबाज कारवाई केली. ही कारवाई सुरू असताना एका ठिकाणी अचानक किरकाेळ स्वरूपाची अाग लागली हाेती. मात्र, अग्निशामक दलाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब करता अागीवर त्वरित नियंत्रण मिळविले.
अाग विझविताना सातपूरच्या अग्निशामक दलाचे जवान रवींद्र लाड यांच्या हाताला किरकाेळ स्वरूपाची जखम झाली अाहे. रविवारी ३३३ अनधिकृत बांधकामे हटविण्यात अाली. या कारवाईत दाेन दिवसांत एकूण ४२७ अनधिकृत बांधकामे हटविण्यात अाली.
सातपूर-अंबड लिंकराेडवरील बहुचर्चित भंगार बाजारचे अतिक्रमण काढण्याची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच हाेती. अतिक्रमण निर्मूलन पथकाने प्रचंड पाेलिस बंदाेबस्तात रविवारी (दि. ८) सकाळी संजीवनगर येथून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. रविवारी सायंकाळपर्यंत संजवीननगर ते विराटनगर या परिसरातील अतिक्रमणे काढण्यात अाली.
यावेळी काही व्यावसायिकांनी अतिक्रमण वाचविण्यासाठी व्यावसायिक बांधकामास रहिवासी बांधकाम दाखविण्यासाठी गाळ्यांमध्ये राहत असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.
शनिवारप्रमाणेच रविवारीही महापालिकेची १२ पाेकलॅण्ड, २१ जेसीबी, १६ डम्पर, २४ ट्रॅक्टर अशी यंत्रसामग्री हाेती. अग्निशामक दलाच्या गाड्या तैनात हाेत्या. ६०० पाेलिस, तितकाच महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बंदाेबस्त हाताळला. अतिशय नियाेजनबद्ध पद्धतीने पाेलिस बंदाेबस्त असल्याने कारवाई वेगाने सुरू अाहे. महापालिका प्रशासन पाेलिस यंत्रणा यांच्यातील समन्वयामुळे धडाकेबाज कारवाई सुरू अाहे.
अविस्मरणीय क्षण
-अनधिकृत भंगार बाजार हटविला जावा यासाठी तब्बल १० वर्षे लढा दिला. हा भंगार बाजार म्हणजे संपूर्ण नाशिककरांसाठी आरोग्याचा धोकादायक सापळा बनला होता. अवैध धंद्याचे केंद्रबिंदू बनला होता. येथील खाडी नावाचा जो भाग होता त्या ठिकाणी कुणी जाऊ शकत नव्हते. त्या ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू होते. एवढा मोठा भंगार बाजार हटविण्याचा लढा हा ऐतिहासिक ठरला अाहे. समस्त नाशिककरांची साथ लाभल्याने मी ही लढाई जिंकलो. भंगार बाजार हटविला गेला हा माझ्यासाठी अविस्मरणीय असा क्षण आहे.
-दिलीप दातीर