आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"एक खिडकी'ला अखेर लाभला मुहूर्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - निवडणुकीचीघोषणा होऊनही प्रतीक्षेत असलेल्या एक खिडकी योजनेस अखेर सहा दिवसांनंतर का होईना मुहूर्त लाभला असून, आता राजकीय पक्षांना एकाच ठिकाणी सभा रॅलीसह कुठल्याही अन्य प्रचारासंबंधीच्या बाबींसाठी परवानगी मिळणार आहे. ही एक खिडकी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्टेट बँकेलगत असलेल्या धान्य वितरण कार्यालयाच्या इमारतीवरील तलाठी पतपेढीच्या कार्यालयात सुरू करण्यात आली आहे.

आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या सर्वच उपक्रमांवर निवडणूक आयोगाने तत्काळ लक्ष ठेवण्यास सुरूवात केली आहे. अद्याप उमेदवार यादी निश्चित झाल्याने कुठलाही राजकीय कार्यक्रम विनापरवानगी होत असल्यास त्यासाठीचा खर्च संबंधित पक्षाच्या खात्यात लावला जाईल. तसेच संबंधितांवर प्रसंगी आचारसंहिता भंगाचा गुन्हाही दाखल होऊ शकतो. मात्र, कार्यक्रमांसाठीच्या परवानगीस मोठा विलंब लागत असल्याने अनेकदा त्याच्या फेऱ्यात अडकता थेट कार्यक्रम राबविण्याचेही प्रकार घडतात. त्या पार्श्वभूमीवर ही एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.

या ठिकाणाहूनच प्रचाराच्या वाहनांची परवानगी, पोलिस परवानगी, प्रचार कार्यालय, तसेच राजकीय पक्षांना आवश्यक आरटीओ, पोलिस यासारख्या अन्य परवानग्या देण्याची योजना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीपासून सुरू केली. विधानसभेतही ती आचारसंहिता लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यास सहा दिवस उशिराने का असेना मुहूर्त लागल्याने आता परवानग्या लगेचच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, अशा परवानग्यांसाठी संबंधित पक्षांना ४८ तास आधीच आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा लागेल.
सुविधा एकाच छताखाली
प्रचारमोहिमेंतर्गत विविध रॅली, प्रचारासाठीची वाहने यांसाठीच्या परवानग्या या एक खिडकीमुळे एकाच ठिकाणाहून घेता येणार आहेत. राजकीय पक्षांना निवडणूक विभागासह पोलिस प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही विविध परवानग्या घ्याव्या लागतात. यात पक्षांचा बराच वेळ वाया जात असल्याने, एक खिडकी योजनेची इच्छुकांसह राजकीय पक्षांनाही प्रतिक्षा लागून होती.