आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाधारकार्ड नाेंदणीवेळी सेतू केंद्रात वादावादी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - येथील सेतू केंद्रावर अाधारकार्ड नाेंदणीसाठी मंगळवारी सकाळी पाच तास रांगेत उभे राहिल्यानंतरही नंबर लागणार नसल्याचे समजल्यावर नागरिकांचा संयम सुटून प्रचंड गाेंधळ होऊन नागरिक कर्मचाऱ्यांत वादावादी झाली. त्यामुळे काेट्यापेक्षा १०० जणांची अधिक नाेंदणी करण्यात अाली. मात्र, तरीही नागरिकांची नाराजी कायम होती.

आधारकार्ड नसलेल्यांना शालेय शासकीय कामकाजात अडथळे येत अाहेत. त्यामुळे त्यांची धावपळ सुरू अाहे. शाळा अन्य ठिकाणची केंद्रे बंद असल्याने महसूल अायुक्तालयासमाेरील सेतू केंद्रातील अाधारकार्ड केंद्रावर सध्या नागरिकांच्या रांगा लागत अाहेत. मंगळवारी मोठी गर्दी होऊन तासन््तास लहान मुले, वृद्ध रांगेत उभे राहूनदेखील नंबर लागल्याने वादावादीचा प्रकार घडला.
या केंद्रावर तीन मशीन असून, एका मशीनवर दरराेज २५० कार्ड काढले जातात. नागरिकांची गर्दी हाेऊन गाेंधळ हाेऊ नये म्हणून केंद्राकडून प्रत्येक मंगळवारी अाधार नाेंदणीचे अर्ज जमा करून त्यांना अाठवड्यात कार्ड काढण्यासाठी बाेलावले जाते. प्रथम येणाऱ्यांना क्रमानुसार कार्ड काढून दिले जातात. अाठवड्याला किमान १२०० अर्ज जमा हाेतात. मंगळवारी अर्ज जमा करण्याच्या दिवशीच मोठी गर्दी झाल्याने गाेंधळ उडाला. त्यावेळी गवळी संघटनेचे अध्यक्ष जगन गवळी यांनी मध्यस्थी करून अधिक १०० जणांची नाेंदणी करण्याची सूचना केल्याने सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने अनर्थ टळला.


..तर गैरसोय टळेल
केंद्रावर फक्त तीन मशीन असून, प्रत्येक मशीनवर दरराेज २५० जणांचे कार्ड काढून दिले जाते. नागरिकांनी सहकार्य करून क्रमाने कार्ड काढल्यास काेणाचीच गैरसाेय हाेणार नाही. कैलासअाढाव, संचालक, सेतू केंद्र
शाळेत केंद्र सुरू करावे
शहरात सेतू कार्यालयातच केंद्र असल्याने नागरिकांची गर्दी हाेत असल्याने प्रत्येक शाळा महापालिका विभागीय कार्यालयात केंद्र सुरू केल्यास गर्दीचे विभाजन हाेऊन गाेंधळ टळेल. जगनगवळी, अध्यक्ष, गवळी समाज संघटना