आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’च्या कार्यालयाचा गाशा गुंडाळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लोकसभा नविडणुकीपूर्वी डॉर्क हार्स मानल्या जाणाऱ्या आम आदमी पक्षाला सद्यस्थितीत साधे कार्यालयही उरलेले नाही. नविडणुकीसाठी थाटलेल्या कदम मेन्शनमधील पक्ष कार्यालयाचा काही दिवसांपूर्वीच गाशा गुंडाळण्यात आला आहे. सध्या मिळेल त्या ठिकाणी जमून कार्यकर्ते पक्षाचे अस्तित्व राखून ठेवण्यासाठी धडपड करीत आहेत.

दिल्ली विधानसभा नविडणुकीत ‘आप’ने प्रस्थापितांना धूळ चारल्याने नाशिकमधील ‘आप’ची घोडदौड सुरू झाली. सिंचन घोटाळा उघडकीस आणणारे सेवानिवृत्त अभियंता विजय पांढरे यांना लोकसभा नविडणुकीत थेट पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात ‘आप’कडून उतरवले गेले. नविडणूक जिंकण्यासाठी पैसेही लागतात, हे लक्षात आल्यावर ‘आप’कडून मदतीचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार महात्मानगर येथे कदम मेन्शन इमारतीत ‘आप’ला कार्यालयही मिळाले. मात्र, निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने या कार्यालयाकडे कोणी फिरकेनासे झाले. त्यातूनच काही महनि्यांतच कार्यालयही खाली करण्याची मागणी जागामालकाने केली.
असे सुरस किस्से

जागा खाली करून देण्याबाबतही सुरस किस्से चर्चेत आले आहेत. पक्षाच्या कमी वयातील कार्यकर्त्यांकडे जबाबदारीची पदे दिल्याने त्यांची छाप पडत नाही, अशी कारणे देत जागामालकाने आक्षेप घेतल्याचे समजते. दुसरीकडे ज्येष्ठ कार्यकर्ता असलेल्या संबंधित मालकाने नाशिक मध्य मतदारसंघातून उमेदवारीसाठी दावा केल्याचे सांगितले जाते. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी पालिकेकडून इमारतीला पूर्णत्वाचा दाखला नसल्यामुळे या ठिकाणी थाटलेले कार्यालय वादात होते. त्यामुळेच ते हलवले, असे उत्तर त्यांनी दिले. सद्यस्थितीत कार्यालयाचे काम पदपथ व कार्यकर्त्यांच्या दुकानासमोरील ओसरीत केले जात असल्याचे सांगितले जाते.
जागेचा शोध सुरू
निवडणुकीनंतरच पक्षाचे कार्यालय स्थलांतरित केले. सद्यस्थितीत कार्यालयाला स्वतंत्र जागा नाही. काही साहित्य माझ्या दुकानात तर काही रवविार कारंजा येथील मित्राच्या गाळ्यात ठेवले आहे. पक्षाची आंदोलने, रणनीती सध्या जेथे मोकळी जागा मिळेल अशा ठिकाणी बसूनच ठरवली जातात.
जितेंद्र भावे, शहर समन्वयक, आम आदमी पक्ष

जागा तात्पुरती दिली

लाेकसभा नविडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर ही जागा आम आदमी पक्षाच्या कार्यालयासाठी देण्यात आली होती. नविडणूक संपल्याने जागा ताब्यात घेण्यात आली असून, त्याचा राजकारणाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.
रावसाहेब कदम, जागामालक