आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Adami Party Bearers Action Against Mina Tai Thakare Sports Stadium

माहिती अधिकाराच्या अर्जावरून ‘अाप’ला क्रीडा खात्याचा ‘ताप’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्व.मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये विविध खेळांसाठी काेणतीही पावती न देता दाेन वर्षांपासून खेळाडूंकडून घेतले जाणारे पैसे काेणाच्या खिशात गेले, याचा माहिती अधिकारात छडा लावण्यासाठी गेलेल्या अाम अादमी पक्ष अर्थातच, ‘अाप’च्या पदाधिकाऱ्यांना क्रीडा खात्यातील ‘पाॅवरफुल’ अधिकाऱ्यांनी चांगलाच ‘ताप’ दिला. माहिती तर साेडा, मात्र ‘अारटीई’चा निव्वळ अर्ज स्वीकारण्यासाठी तब्बल दाेन तास या खुर्चीतून त्या खुर्चीतील अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवण्यास भाग पाडले. परिणामी, या प्रकरणात खराेखरच क्रीडा खाते का पांघरूण टाकते, असा संशय वाढला अाहे.
महापालिकेने दाेन वर्षांपूर्वी हस्तांतरित केलेल्या स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये विविध खेळांसाठी काेणतीही पावती देता शुल्क अाकारणी हाेत हाेती. निव्वळ बॅटमिंटन काेर्टचा विचार केला तर अाठ काेर्टमध्ये सकाळच्या तीन तासांत ६० हजारांपर्यंत शुल्क जमा हाेईल, अशी परिस्थिती हाेती. सायंकाळी व्यावसायिक खेळासाठी अाठ काेर्ट उपलब्ध करून दिले जात हाेते. त्यातून मिळणाऱ्या शुल्काच्या बदल्यात पावती दिली तर जातच नव्हती, मात्र येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांची दादागिरीही सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत गेल्या हाेत्या. मराठी’ने ‘डी. बी. स्टार’मधून येथील दुरवस्थेवर प्रकाश टाकल्यावर क्रीडा अधिकारी सबनीस यांनीही पावती छापण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले हाेते. काळजी करण्याचे कारण नसून, वसूल केलेले शुल्क सरकारी तिजाेरीत जमा झाल्याचा दावा केला हाेता. या सर्व प्रकरणाची माहिती घेण्यासाठी ‘आप’चे जितेंद्र भावे, जसबिरसिंग यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुरुवारी क्रीडा खात्याकडे धाव घेतली. मात्र, येथे त्यांना अर्ज दाखल करून घेण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागला.

विभागीय आयुक्तांना भेटणार
^क्रीडासंकुलातील शुल्क वसुली व्यवस्थित असेल तर सर्व हिशेब माहिती अधिकारात देणे गरजेचे अाहे. मात्र, अर्ज दाखल करून घेण्यासाठी झालेली टाळाटाळ संशयास्पद अाहे. विभागीय अायुक्तांची भेट घेऊन चाैकशीची मागणी केली जाणार अाहे. जितेंद्र भावे, अामअादमी पक्ष

कर्मचारीच झाले साहेब
क्रीडा अधिकारी सबनीस जागेवर नसल्यामुळे भावे यांनी अर्ज दाखल करून घेण्याची विनंती पवार नामक कर्मचाऱ्याकडे केली. त्यावर पवार यांनी सबनीस यांच्याकडे नव्हे, तर ठाकरे स्टेडियमलगत असलेल्या क्रीडा उपसंचालकांकडे दाद मागावी लागेल, असे सांगितले. त्यावर भावे यांनी माहिती घेतली असता सबनीस यांच्याकडेच संबंधित रिक्त पदाचा प्रभार असल्याचे समजले. त्यामुळे उगाच खेटे मारण्यापेक्षा अर्ज दाखल करून घ्या, असे सांगितल्यावर त्यांना सबनीस यांच्याशी संपर्क साधण्याचे उत्तर मिळाले. थेट सबनीस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माझे नाव सांगून कार्यालयातच अर्ज द्या, असे सांगितले. मात्र, त्यानंतरही कर्मचाऱ्यांनी एेकले नाही. अखेर भावे यांनी पुन्हा सबनीस यांचा भ्रमणध्वनी जाेडून िदल्यावर संबंधित कर्मचाऱ्याने कसाबसा अर्ज दाखल करून घेतला.

उच्चपदस्थ गप्प का?
दाेनवर्षांत बॅडमिंटन अन्य खेळांपाेटी वसूल झालेल्या पैशाचा हिशेब घेण्यासाठी उच्चपदस्थ अधिकारी गप्प का, असा सवालही निर्माण झाला अाहे. यातील अनियमितता तपासून जे काही खरे अाहे ते उजेडात अाणणे गरजेचे अाहे. या विभागीय क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष विभागीय अायुक्त असून, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी मध्यंतरी दाैरा करून अनियमिततेवर प्रकाश टाकला हाेता. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी लक्ष घातले तर वसूल केलेल्या शुल्कातून दुरवस्था तरी दूर हाेईल, अशी अाशा व्यक्त हाेत अाहे.