आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Adami Party Demonastration Against Polution Of Godavari

गोदावरीच्या गटारीकरणाविरोधात आम आदमी पक्षाची निदर्शने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील सांडपाणी गोदावरीत सोडण्याची योजना बंद करा अन्यथा आम आदमी पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देत ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी सोमवारी गोदावरीच्या गटारीकरणाविरोधात निदर्शने केली.
गोदावरी गटारीकरणविरोधी मंचच्या कामाला पाठींबा देण्यासाठी ‘आप’ने नाशिक महापालिकेसमोर आंदोलन केले. गोदावरीत थेट सांडपाणी सोडणे, निर्माल्य नदीत टाकणे, गाड्या व कपडे धुणे, प्लॅस्टीकच्या पिशव्या टाकण्या या प्रकारामुळे गोदावरीचे प्रदुषण होत आहे. हे टाळण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प तयार करून ते पाणी वीजनिर्मिती प्रकल्प वा कृषीसाठी दिले पाहिजे. याबरोबरच 40 मायक्रॉनपेक्षा पातळ कॅरिबॅगवर बंदी घालावी. निर्माल्य कलशांची संख्या वाढवून ते गोळा करण्यासाठी महापालिकेने प्रदुषण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच गोदावरीत कपडे व गाड्या धुणार्‍यांवर कारवाई करावी, आदी मागण्या ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी केल्या. तसेच महापालिका प्रशासनाला मागण्यांचे निवेदनही सादर केले. यावेळी समन्वयक जितेंद्र भावे, स्वप्नील घिया, जगबिरसिंग आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलिस कोठे गेले ?
गोदावरी प्रदूषित करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी उच्च् न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिसांची नेमणूक करण्यात आली. प्रत्यक्षात केवळ चार दिवसच पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर मात्र अपुर्‍या मनुष्यबळाचे कारण देत बंदोबस्त काढून घेण्यात आला. न्यायालयाचा अवमान करण्यासारखी ही बाब असून कोणाचाच प्रतिबंध नसल्यामुळे गोदा प्रदूषण वाढत आहे, अशी प्रतिक्रिया ‘आप’चे जिल्हा समन्वयक जितेंद्र भावे यांनी व्यक्त केली.