आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांभिक अजित पवारांना जेलमध्ये टाकाच : पांढरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘मी दोषी असेल तर जेलमध्ये टाका,’ असे वक्तव्य करणार्‍या अजित पवार यांचे विधान दांभिक आहे. सिंचन घोटाळ्यात तेच दोषी असून त्यांना जेलमध्ये टाकाच, अशी मागणी नाशकातील आम आदमी पक्षाचे उमेदवार तथा ‘मेटा’चे सेवानिवृत्त अभियंता विजय पांढरे यांनी केली आहे. बारा प्रश्नांद्वारे त्यांनी पुन्हा सिंचन घोटाळ्यातील भ्रष्टाचाराच्या प्रलंबित चौकशीकडे लक्ष वेधले.
जाहीरनामा प्रसिद्धीसाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पांढरे म्हणाले की, ‘विदर्भातील 2900 कोटींच्या निविदा भ्रष्टाचारामुळे रद्द झाल्याने त्याची जबाबदारी मंत्र्यांवरच येते. तसेच 1500 कोटींच्या वाढीव इस्टिमेटची रक्कम अधिकार्‍यांकडून वसुलीचे आदेश दिल्यामुळे पवारच या अपहारालाही जबाबदार आहेत.’
‘आम’ जाहीरनामा
० नाशिक शहरात मोनोरेल सुरू करणार.
० छोटे उड्डाणपूल व रिंगरोडचे नियोजन करणार.
० रोजगारासाठी आयटी पार्कचे विस्तारीकरण करणार.
० नाशिक-पुणे लोहमार्गाचा पाठपुरावा करणार.
० नाशिक-सुरत, नाशिक-डहाणू लोहमार्गासाठी प्रयत्न.
० कुंभमेळ्याचे नियोजन व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन.
० गोदावरी प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार.
० औद्योगिक सांडपाणी प्रक्रियेसाठी सीईटीपी प्रकल्प आणणार.
० सिव्हेज वॉटर ट्रिटमेंट प्लॅँट कार्यान्वित करणार.
० शेतकर्‍यांना उत्पादन खर्चावर आधारित दरासाठी पाठपुरावा.