सिडको - महिनाभरापासून पोलिस प्रशासनाने नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना देता इंदिरानगर बोगदा वाहतुकीसाठी बंद केला आहे. हा बोगदा पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी आता आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरली असून, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘
आप’ने हे आंदोलन सुरू केले आहे.
जोपर्यंत बोगदा सुरू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवले जाणार आहे, असा निर्धार ‘आप’ने व्यक्त केला आहे. यावेळी राजेश कांकरेज, राजू आचार्य, विकास पाटील, प्रबोधिनी चव्हाण, पद्माकर आहिरे, जगबीर सिंग आदी उपस्थित होते.
हा बोगदा पुन्हा खुला करावा, या मागणीसाठी त्यानंतर शिवसेना, मनसे, आप आदी राजकीय पक्षांनी आंदोलने केली. लोकप्रतिनिधी नागरिकांनी पोलिस आयुक्तांशी चर्चा केली. मात्र, प्रशासनाकडून या प्रश्नी चालढकल सुरू आहे. इंदिरानगर बोगदा हा नागरिकांसाठी सोयीचा रस्ता होता. या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने त्यावर उपाय म्हणून सिग्नल यंत्रणा वाहतूक पोलिस वाढवून प्रश्न सोडविता आला असता. मात्र, पोलिस संबंधित प्रशासनाने थेट बोगदा बंद करण्याचा निर्णय घेतला. हा रस्ता बंद करताना नागरिकांशी चर्चा करणे गरजेचे होते. मात्र, तसे करता थेट बोगदा बंद केला. त्यानंतर नागरिकांचा सर्व्हे करून पुढील निर्णय घेतला जाणार होता. सर्व्हेत जवळपास ९५ टक्के नागरिकांनी बोगदा सुरू करावा, अशी मागणी केली आहे. तरीही पोलिस आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
जनमत संग्रह
आमआदमी पार्टीतर्फे इंदिरानगर बोगदा येथे वाहनचालक नागरिकांकडून बोगदा सुरू करण्याच्या समर्थनार्थ अर्ज भरून घेतले जात आहेत. ‘आप’चे कार्यकरर्ते उभे राहून अर्ज संकलन करत आहेत.