आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’च्या धसक्याने मनसे कामाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - दिल्लीतील विजयानंतर आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नाशकात स्वच्छतेसारखे विविध उपक्रम राबवत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच उपक्रमांचा आता महापालिकेतील सत्ताधारी मनसेच्या नगरसेवकांनीही चांगलाच धसका घेत स्वच्छता मोहीम राबविली.

प्रभाग क्रमांक 48 मध्ये कामटवाडे, त्रिमूर्ती चौक, शिवशक्ती चौक परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांनी स्वच्छतेची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. प्रशासनाकडून नगरसेवकांनाही दाद दिली जात नसल्याने नागरिक संतप्त झाले होते. मात्र, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम आदमी पक्षाने विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केल्याने मनसेलाही जाग आली आहे. आम आदमी पक्षाने नाशिकरोड, सिडको, पंचवटीत स्वच्छता मोहीम हाती घेतली. त्याच धर्तीवर कामटवाडे परिसरात स्वच्छता मोहिमेचा बुधवारी मनसेच्या वतीने प्रारंभ करण्यात आला. नगरसेवक अनिल मटाले, नगरसेविका कांचन पाटील यांनी मोहीम कायमस्वरूपी राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या वेळी किशोर फुलदेवरे, बाळासाहेब मटाले, नामदेव पाटील, महापालिका अधिकारी विठ्ठल पवार, प्रकाश पठाडे, प्रदीप मोरे, रावसाहेब रूपवते, राजाभाऊ सोनवणे आदी उपस्थित होते.