आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’कडून बसस्थानक स्वच्छ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- राष्टपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याची नेहमीची प्रथा आम आदमी पक्षाने गुरुवारी मोडीत काढली. वर्षानुवर्षांपासूनच्या घाणीच्या साम्राज्यातील नाशिकरोड बसस्थानकाची ‘झाडू’ने साफसफाई करून वेगळ्या प्रकारे महात्मा गांधी यांना अभिवादन केले. या अभिनव उपक्रमाव्दारे ‘आप’ने राजकीय पक्ष व जनतेसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

पक्ष समन्वयक जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वाखाली स्वप्नील घिया, जगबिर सिंग, भालचंद्र राजपूत, अँड. प्रभाकर वायचळे, पद्माकर इंगळे, सचिन शिंगारे, अक्षय अहिरे, विशाल चौधरी, मनीष काळे, कर्नल खासगीवाले, शालिग्राम वानखेडे, कैलास मोरे आदी 50पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी ओला व सुका कचरा गोळा केला व दुर्गंधीयुक्त बसस्थानकाचा कोपरा न् कोपरा झाडून स्वच्छ केला. घाण जमा केली. बाजूचा खड्डा स्थानकाच्या आवारातील माती टाकून बुजवण्यात आला. स्थानकाच्या आवारातील कॅन्टीनच्या जागेतील घाण कार्यकर्त्यांना साफ करणे शक्य झाले नाही. याठिकाणी परिसरातील हॉटेल व्यावसायिकांनी ट्रकभर घाण टाकून ठेवली असून, स्वच्छतेसाठी मोठय़ा यंत्रणेची गरज असल्याचे जितेंद्र भावे यांनी सांगितले. मोहिमेदरम्यान स्थानकावरील प्रवाशांसाठी सभासद नोंदणी मोहीम राबविण्यात आली.

‘रद्दी’तून पक्ष निधी संकलन
आम आदमी पक्षासाठी जनतेकडून रद्दी गोळा करून पक्ष निधी संकलित करण्यात येणार आहे. या निधीतून आगामी निवडणूक लढविली जाणार आहे. जनतेने (मोबाइल- 9225792255) या क्रमांकावर संपर्क साधून पक्षाच्या सदस्याकडे रद्दी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले.


भ्रष्टाचाररूपी घाण साफ करणार
आम आदमी पक्षाने महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त नाशिकरोड बसस्थानकाची स्वच्छता केली. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांना भेडसावणारी भ्रष्टाचाररूपी घाण स्वच्छ करण्याचा संकल्प केला. जितेंद्र भावे, समन्वयक, आम आदमी पक्ष

महिला सबलीकरण अभियान
‘आप’कडून महिला सबलीकरण अभियान राबविले जात आहे. छेडछाड, रॅगिंग, घरेलू हिंसा किंवा हुंड्यासाठी छळ होत असल्यास महिलांनी हेल्पलाइनवर (9370246721) संपर्क साधावा. - अँड. मीनल भोसले, सदस्य, आप