आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’ची नवी कार्यकारिणी जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- 'आप'मधील मतभेदाने पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी स्थानिक पदाधिकार्‍यांसह दिल्लीतील राष्ट्रीय पदाधिकार्‍यांनी दखल घेत पार्टीची जुनी कार्यकारिणी बरखास्त करत नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या नव्या कार्यकारिणीत जिल्हा संयोजक पदावर असलेले डॉ. गिरधर पाटील यांना वगळण्यात आल्याचे आपच्या वतीने पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
मंगळवारी पक्षाचे राज्य सदस्य संजीव साने, लोकसभेचे उमेदवार विजय पांढरे, सुभाष तन्वर, राहुल भारती यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्याची माहिती राज्य पदाधिकार्‍यांमार्फत दिल्लीतील राष्ट्रीय कार्यकारिणीस सादर करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी अशी
नाशिक जिल्हा संयोजक-अँड. प्रभाकर वायचळे, जिल्हा सचिव-मुकुंद बेणी, खजिनदार सुरेश शिंदे, सहसंयोजक अल्ताफ शेख, नाशिक तालुका समिती प्रमुख ज्ञानेश्वर जाधव, सदस्य नकुल बोराडे, तेजस सोनार, कल्पना पाठक यांची निवड करण्यात आली.