आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्यांमध्ये जागवली छाेटीशी‘अाशा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ज्यांचंदर्शन म्हणजे साक्षात सरस्वतीचं दर्शन.. जे व्यक्तिमत्त्वच एक सुरेल गाणं बनून राहिलं अाहे.. वयाच्या शतकाकडे निघालेली असतानाही अाज साेळाव्यासारखीच प्रफुल्लित अाहे.. स्वरांवर प्रेम करतानाच गाण्याच्या विस्कटलेपणावर परखड मत नाेंदवणारी अाणि िचमुकल्यांवर मायेचा हात फिरवून त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देत त्यांच्यात छाेटीसी ‘अाशा’ जागवणारी स्वरयाेगिनी अर्थात अाशा भाेसले... त्यांना पाहिले, त्यांनी गायले अाणि जगच जिंकले, असा अभिमानास्पद अनुभव साेमवारी िचमुकल्यांनी घेतला.
‘अाशाताई येणार.. अाशाताई येणार..’ म्हणता म्हणता एका छाेट्याशा दारातून स्वच्छ पांढऱ्या साडीत साक्षात सरस्वती अवतरावी, असे त्यांचे अागमन हाेते अाणि ‘अाशा, अाशा’ असा जल्लाेष हाेताे. त्याला त्याही हात उंचावून दाद देतात. मविप्र सांस्कृतिक महाेत्सवाच्या समाराेपाला या एव्हरग्रीन व्यक्तिमत्त्वाचे अागमन म्हणजे अायुष्यातला भाग्याचा क्षण मानत ताे प्रत्येकाने साजरा केला. महाेत्सवातील पारिताेषिक विजेत्या संघांनी अाशाताईंपुढे अापली कला सादर केली. ते पाहण्यात अाणि ‘वाऽऽ ह, क्या बात है’ अशी दाद देण्यात पुढे हाेत्या त्या अाशाताईच. ‘गाणं कसं गायलं पाहिजे’ हेदेखील त्यांनी विजेत्यांना जवळ बाेलावून सांगितलं, तेव्हा अापल्याला साक्षात गाण्यातील देवताच भेटल्याचा अानंद त्या िचमुरड्यांच्या चेहऱ्यावर िदसत हाेता. अखेरीस कला सादरीकरण संपले प्रतीक्षेत असलेला क्षण जवळ अाला. मंचावर अाशाताई येताच पुन्हा एकदा पाेरांनी जणू अापल्या मैत्रिणीलाच बरेच दिवसांनी बघताे अाहाेत, अशा जल्लाेषात स्वागत केले. अाशाताईंच्या हाती जेव्हा माईक अाला, तेव्हा तर टाळ्यांचा कडकडाट अाणि विद्यार्थ्यांच्या अावाजाने रावसाहेब थाेरात सभागृह दणाणून गेले.
मविप्र सांस्कृतिक महाेत्सवात अाशा भाेसले यांनी ‘रेशमाच्या धाग्यांनी.. लाल काळ्या धाग्यांनी..’ हे गाणे सादर करून सर्वांची मने जिंकली.