आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षणानंतरच हटणार भंगार बाजार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक । अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता महापालिकेने पोलिस संरक्षण मिळेपर्यंत भंगार बाजार हटवता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. बंदोबस्तासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आयुक्त संजय खंदारे यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पालिकेने व्यापार्‍यांना विशिष्ट मुदत दिली होती. ती उलटल्यानंतरही भंगार बाजार सुरूच आहे. याबाबत खंदारे यांना छेडले असता त्यांनी पोलिस संरक्षणाशिवाय भंगार बाजार हटवता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यासाठी पाठपुरावा सुरू असून त्यानंतर लवकरात लवकर अतिक्रमण हटवले जाईल. व्यापार्‍यांनी स्वत: अतिक्रमण हटवले नाही तर पालिका सर्व खर्च त्यांच्याकडून वसूल करेल, असा इशाराही त्यांनी दिला.