आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : शिवसेना ठरेल माेठा पक्ष (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेत सत्ताधारी मनसेची जोरदार घसरगुंडी हाेणार असून शिवसेना आणि भाजपला त्याचा लाभ होण्याची चिन्हे आहेत. परिणामी, शिवसेना आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर आहे. अशा स्थितीत कुणा एका पक्षाला निर्विवाद यश मिळण्याची शक्यता मावळली असली तरी शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा संभव आहे.
 
दोन वर्षांत भाजपही हवाही बऱ्यापैकी खाली बसली आहे. मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिनही पक्षांविषयीची नकारात्मकता मोठी आहे. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ‘क्रॉस व्होटिंग’ झाले; त्याचप्रमाणे मतदारांची नांवे यादीतून गायब झाल्याचा फटकाही प्रामुख्याने बसू शकतो. तरी देखील शिवसेना आणि भाजप हेच दोन सत्तेसाठीचे मुख्य दावेदार असतील. मात्र, कुणीच ६२ चा आकडा गाठू शकणार नाही.
 
बातम्या आणखी आहेत...