आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिषेक कृष्णा नाशिकचे नवे महापालिका अायुक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांची मुंबईत विक्रीकर विभागाच्या सहअायुक्तपदी बदली झाली अाहे. त्यामुळे रिक्त झालेल्या नाशिकच्या अायुक्तपदी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांची नियुक्ती झाली अाहे. साेमवारी ते पदभार स्वीकारणार अाहेत.

अभिषेक कृष्णा हे २००६ च्या अायएएस बॅचचे अधिकारी असून त्यांनी अाैरंगाबाद येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून प्रारंभीच्या काळात काम केले अाहे. त्यानंतर त्यांनी अादिवासी विकास विभागात नंदुरबार येथे प्रकल्प अधिकारी म्हणून, गाेंदिया जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी अाणि गडचिराेली येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले अाहे. गेल्या काही वर्षांपासून पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते कार्यरत हाेते. नाशिक महापालिका अायुक्त पदाच्या नियुक्तीचा मेल त्यांना गुरुवारी दुपारी प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी साेमवारी रुजू हाेणार असल्याचे स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...