आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्यापासून फरार प्रकाश लाेंढे पाेलिसांना शरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाेलिसाला मारहाणप्रकरणी महिनाभरापासून यंत्रणेला चकवा देणारे रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश लाेंढे अटकेच्या भीतीने बुधवारी (दि. १५) सरकारवाडा पाेलिसांना शरण अाले. पाेलिसांनी त्यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले असून, गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सांगण्यात अाले.
या घटनेने पाेलिसांचे अपयश पुन्हा एकदा उघड झाले असून, न्यायालयाने निकाल देऊनही पाेलिसांना त्यांचा सुगावा लागला नाही, याबद्दल अाश्चर्य व्यक्त करण्यात येत अाहे. दुसरीकडे दुहेरी खून प्रकरणात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळूनही लाेंढे यांचा मुलगा भूषण पाेलिसांना गुंगारा देत अाहे.

सातपूर येथील सराईत गुन्हेगारांच्या दुहेरी खून प्रकरणात त्र्यंबकेश्वर पाेलिसांनी अटक केलेल्या पाच संशयितांना न्यायालयाच्या अावारात लाेंढे यांनी पाण्याच्या बाटलीतून मद्य देण्याचा प्रयत्न केला हाेता. पोलिस कर्मचारी संदीप अहिरे यांनी हटकले असता लोंढे यांनी त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ केली हाेती. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा लाेंढेंविराेधात दाखल करण्यात अाला हाेता. अटक टाळण्यासाठी लोंढे यांनी जिल्हा न्यायालयापाठाेपाठ उच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र, लाेंढे याची संपूर्ण गुन्हेगारी पार्श्वभूमीच पाेलिसांनी न्यायालयात सादर केल्याने मंगळवारी (दि. १४) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात अाला. या निकालानंतर लाेंढे यांना काेणत्याही क्षणी अटक हाेण्याची शक्यता वर्तविली जात हाेती. त्यासाठी उपअायुक्त, सहायक अायुक्तांसह मुंबई नाका, भद्रकाली सरकारवाडा पाेलिसांचे विशेष पथक कार्यान्वित करण्यात अाले हाेते. मंगळवारी रात्रभर लाेंढे यांचा शाेधही घेण्यात अाला. पण, बुधवारी ते स्वत:च पाेलिस ठाण्यात हजर झाले.
या गुन्ह्यात लाेंढे यांना पाेलिसांनी सायंकाळी अटक केली. त्यांना किमान अाठ दिवस पाेलिस काेठडी मिळण्याची मागणी तपासी अधिकाऱ्यांकडून केली जाणार असल्याचे सांगण्यात अाले. यामध्ये पाेलिस लाेंढे यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती सादर करणार अाहेत. लाेंढे नगरसेवक असल्याने राजकीय पक्षाच्या समर्थकांमार्फत फिर्यादी कर्मचाऱ्यावर दबाव अाणण्याची साक्षीदारांना धमकावण्याचीही शक्यता पाेलिस यंत्रणेकडून वर्तविण्यात अाली अाहे.
नगरसेवक प्रकाश लाेंढे सरकारवाडा पाेलिस ठाण्यात सहायक पाेलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्यासमाेर हजर झाले.