आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबू जुंदालच्या जामिनावर सुनावणी पुढे , २४ सप्टेंबरला पुन्हा सुनावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्रपोलिस प्रबोधिनीच्या आवारात घुसून रेकी करून घातपाताचा कट रचल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी िबलाल ऊर्फ लालबाबा शेख हिमायत बेग यांच्याबरोबरच याच गुन्ह्यातील आणखी एक संशयित मुंबईतील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यातील आरोपी अबू जुंदाल याच्या जामीन अर्जावर गुरुवारी (दि.. १८) होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. ऑर्थररोड कारागृह प्रशासनाने त्याचे म्हणणे सादर केल्याने आता २४ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

या खटल्याची नियमित सुनावणी विशेष न्यायाधीश तंत्रपाळे यांच्यासमोर सुरू झाली असताना अबू जुंदाल याच्या वकिलांनी त्याचा गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झालेला नसून, त्यास जामिनावर मुक्त करण्याची मागणी केली. विशेष सत्र न्यायाधीशांनी ऑर्थररोड कारागृह प्रशासनास बाजू मांडण्याचे आदेश दिले परंतु माहिती सादर केल्याने पुढील सुनावणी २४ सप्टेंबरला ठेवली आहे. याप्रसंगी एटीएसचे विशेष सरकारी वकील अजय मसिर जुंदालकडून अ‍ॅड. पांडे हजर झाले होते.