आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अबू जिंदालने न्यायालयात सर्व आरोप फेटाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशकात रेकी करून घातपाती कारवायांचा कट रचल्याप्रकरणातील आरोपी व लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी अबू जिंदाल याने विशेष न्यायालयासमोर त्याच्यावर ठेवण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. या प्रकरणात आपल्याला नाहक गोवण्यात आले असून आपला त्याच्या कुठलाही संबंध नसल्याचे त्याने म्हटले आहे. यानंतर मुख्य न्याय दंडाधिक-यांच्या न्यायालयात सादर केलेले दोषारोपपत्र विशेष सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले.

नाशकात शेख लालबाबा ऊर्फ बिलाल आणि हिमायत बेगसह त्यालाही आरोपी करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध 57 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. याप्रकरणातही त्याने नन्नाचा पाढा कायम ठेवला. या वेळी एटीएसचे वकील अजय मिसर यांनी तपासी पथकाची बाजू मांडली. जिंदालवरील दोषारोपपत्र विशेष न्यायाधीश के. के. तंत्रपाळे यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आले असून, पुढील सुनावणी 20 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे. विधी सेवा प्राधिकरणाकडून जिंदाल याच्या मागणीनुसार बाजू मांडण्यासाठी वकील देण्यात आला. जिंदालला न्यायालयात हजर केले त्या वेळी मोठा बंदोबस्त तैनात होता.