आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस आयुक्तालयात महिलेसोबत गैरवर्तन, पीडितेचा तक्रार अर्ज फेटाळून वरिष्ठांचेही जाधवला ‘आशीर्वाद’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- लाचखोरीबद्दल सध्या अटकेत असलेला नाशिकचा पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव याने वर्षभरापूर्वी पोलिस कोठडीत असलेल्या एका महिलेची अत्यंत ‘निंदनीय’ झडती घेतल्याचा हिणकस आणि संतापजनक प्रकार पुढे आला आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यातच याबाबत पीडित महिलेने नाशिकच्या पोलिस आयुक्तालयात दाखल केलेल्या तक्रारीस केराची टोपली दाखवून वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही गैरकृत्यावरील आपला ‘कृपाशीर्वाद’ सिद्ध केला. वर्षभर सुरू असलेल्या नाशिक पोलिसांच्या या किळसवाण्या खेळाची माहिती जाधवच्या अटकेनंतर थेट पोलिस मुख्यालयात पोहोचली आहे. जाधवचे गैरवर्तन आणि त्यास पाठीशी घालणारे वरिष्ठ अधिकारी या दोघांविरोधात चौकशी करण्याचे आदेश उच्चाधिकारी स्तरावरून देण्यात आले आहेत. 


फ्लॅटच्या खरेदी-विक्रीच्या तक्रारीबाबत पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी फिर्यादीकडूनच लाच मागणारा जाधवयाच्या कुवर्तनाच्या तक्रारींची संख्या वाढत चालली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात त्याने एका प्रकरणातील महिलेसोबत पोलिस आयुक्तालयातच गैरवर्तन केल्याची तक्रार दाखल झाली आहे. सदर वर्तनामुळे प्रचंड घाबरलेली ‘ती’ महिला मानसिक धक्क्यामुळे बेशुद्धही झाली होती. त्या धक्क्यातून सावरल्यावर, तिने प्रचंड धावपळ करून जाधव विरोधातील पुरावे मिळवले. त्यासह पोलिस आयुक्तालयात ऑगस्टमध्ये रितसर तक्रार दाखल करण्यात आली. तत्कालीन उपायुक्त दत्तात्रेय कराळे यांनी चौकशीही सुरू केली होती. परंतु, त्यांची अचानक बदली झाल्याने कारवाई मागे पडली. पुढे मात्र, या तक्रारीनुसार जाधवची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी नाशिक पोलिसांनी हा अर्ज मागे घेण्यासाठी पीडितेस धमकावून जाधवला पाठीशी घातल्याचे दिसते. 

बातम्या आणखी आहेत...