आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ABVP Won Four Student Seats In Health Science University

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य विज्ञान विद्यापीठावर फडकला 'अभाविप'चा झेंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्रआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सहापैकी चार जागांवर विजय मिळवत झेंडा रोवला. विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी 'अभाविप'च्या यवतमाळ येथील विद्यार्थी सदस्य स्नेहल धुमारे हिची, तर सचिवपदी नागपूरच्या ज्ञानदीप नखाते यांची अविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमरावती येथील रोहित मापारी याची, तर सहसचिवपदी यवतमाळचा कुरेशी महामप अकबर इक्बाल यांची निवड झाली.

आरोग्य विद्यापीठात विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे गठण करण्यात आले आहे. गुरुवारी विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांसाठी निवडणूक झाली. विद्यापीठ अधिनियमांनुसार विद्यार्थी परिषदेतून तीन उमेदवारांची अविरोध निवड झाली. त्यात पुण्यातील कॉलेज ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटरची अक्षता काळजे, ठाण्यातील राजीव गांधी वैद्यकीय कॉलेजचा हर्षल पाडेकर, तर कोल्हापूरच्या डॉ. जे. जे. मगदुम होमिओपॅथिक मेडिकलचा विद्यार्थी नवाज शरीफ तांबोळी यांची अधिसभेवर निवड झाली.

या निवडणुकीत विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी यवतमाळ येथील श्रीमती सुमित्राबाई ठाकरे कॉलेज ऑफ नर्सिंगची स्नेहल धुमारे, उपाध्यक्षपदी अमरावतीची डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचा रोहित मापारी आणि ठाणे येथील राजीव गांधी वैद्यकीय कॉलेजचा हर्षल पाडेकर, सचिवपदी नागपूर येथील के. आर. पांडव आयुर्वेद कॉलेजचा ज्ञानदीप नखाते आणि सहसचिवपदी पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील होमिओपॅथिक कॉलेजची संजना किल्लावाला आणि यवतमाळचा कुरेशी अकबर इक्बाल यांची निवड झाल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. के. डी. गरकळ यांनी दिली आहे.

नवनियुक्त पदाधिका-यांचा कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच नवनियुक्त पदाधिका-यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले.