आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ACB To Urge Court To Extend PWD Engineers' Custody

चिखलीकर-वाघचा ताबा ‘एसीबी’कडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - तीन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेले सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर व शाखा अभियंता जगदीश वाघ याची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. पोलिस कोठडीची मुदत संपण्यास आणखी दोन दिवसांचा कालावधी असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पुन्हा ताब्यात घेतले आहे.

चिखलीकर व वाघ यांना 22 हजारांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. या प्रकरणात सुरुवातीला त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी दिली होती, ती संपल्यानंतर न्यायालयाने पुन्हा सात दिवसांची कोठडी सुनावली. दरम्यान,प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे विविध चाचण्यांनंतर मंगळवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

दोघांच्या पत्नीची चौकशी
आतापर्यंतच्या चिखलीकर व त्याची पत्नी स्वाती यांच्या नावे सुमारे 20 कोटींची, तर वाघ व त्याची पत्नी दीपाली यांच्या नावे सुमारे 1 कोटीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. मंगळवारी या दोघांसोबत स्वाती व दीपाली यांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. बेहिशेबी मालमत्ता संपादित करण्यात त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्यावरच त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.