आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना प्रवेश सुरुच गोकूळ पिंगळे, अमाेल जाधव यांच्यासह अनेक मंडळींचा पक्ष प्रवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका अाणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ‘इनकमिंग सुविधा’ सुरूच असून, माजी अामदार काशीनाथ मेंगाळ, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक गाेकुळ पिंगळे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अमाेल जाधव, जिल्हा परिषदेच्या सदस्य सुशीला मेंगाळ, साेमनाथ फडाेळ, मनसेचे शहर चिटणीस नंदू वराडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. ६) मुंबई येथे शिवबंधन बांधले.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘माताेश्री’वर झालेल्या पक्षप्रवेशाच्या साेहळ्यास अनेक पदाधिकारी उपस्थित हाेते. यावेळी उपराेक्त अाजी-माजी पदाधिकाऱ्यांसह नांदगावचे माजी नगराध्यक्ष राजेश (बॉबी) कवडे, माजी नगरसेवक बाळासाहेब राऊतराय, मुकुंद खरोटे, काका दुसाने, भरत सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष सुनील जाधव, प्रकाश दंडगव्हाळ, मनमाडचे माजी नगराध्यक्षसाईनाथ गिडगे, मुराद शेख, उपशहर प्रमुख राजू तरकाळे, मनसे शहर प्रमुख अमजद शेख, खालिद शेख, प्रवासी सेनाप्रमुख बबन वाघ, दीपक हांडगे, इगतपुरी पंचायत समितीचे सभापती गोपाळ लहानगे, पंचायत समिती सदस्य हरिदास लोहकरे, पिंपळगाव घडगाचे सरपंच बाहिल घाडगे, उपसरपंच तानाजी देवगिरे, पिंपळगाव डुकराचे सरपंच भगवान वाघचौरे, शेनितचे सरपंच अशोक जाधव, धोंडीराम कौले, मुरंबीचे सरपंच संजय मते, लक्ष्मीनगरचे सरपंच सुदाम बेंडकुळे, अडसरे खुर्दचे सरपंच ज्ञानेश्वर मोंढे, मळगावचे सरपंच कुणाल आहेर आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.

याप्रसंगी राज्यमंत्री दादा भुसे, संपर्क प्रमुख अामदार अजय चौधरी, माजी मंत्री बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, आमदार योगेश घोलप, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, राजू लवटे, नगरसेवक अॅड. यतिन वाघ, अॅड. शिवाजी सहाणे, विलास शिंदे, देवानंद बिरारी, महेश बडवे, योगेश बेलदार आदी उपस्थित होते.

काँॅग्रेस, राष्ट्रवादीत गळती सुरूच राहणार
माजी गटनेते विनायक खैरे यांच्यानंतर गाेकुळ पिंगळे यांच्या रूपाने शिवसेनेने राष्ट्रवादीची माेठी ‘विकेट’ घेतल्याचे बाेलले जात अाहे. यानंतर राष्ट्रवादीतील अाणखी काही बडी मंडळीही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, काँग्रेसचे माजी नगरसेवक स्थायी समितीचे माजी सभापती अमाेल जाधव यांच्यापाठाेपाठ अन्य काही नगरसेवकही शिवसेनेत जाण्यासाठी इच्छुक असल्याचे कळते.

बातम्या आणखी आहेत...