आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accession Upset Them Into Confidence Set Ashwini Boraste

नाराजांना विश्वासात घेऊनच पदग्रहण निश्चित - अश्विनी बोरस्ते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-नाराज गटाला विश्वासात घेऊनच शुक्रवारी (दि. 7) पदग्रहणाचा मुहूर्त ठरवल्याचे काँग्रेस शहराध्यक्षा अश्विनी बोरस्ते यांनी बुधवारी जाहीर केले. माजी अध्यक्ष अँड. आकाश छाजेड यांच्या उपस्थितीत नाराज गटातील नेत्यांचा नामोल्लेख टाळणार्‍या बोरस्ते यांच्या पदग्रहणास हे नेते हजेरी लावतील का, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहराध्यक्षपदावरून काही दिवसांपासून सुरू असलेली गटबाजी नव्या नियुक्तीनंतर आटोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच बोरस्ते यांनी अद्याप पदभार न स्वीकारल्यासंदर्भात चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोरस्ते म्हणाल्या, शहराध्यक्षपदी नियुक्ती करून पक्षर्शेष्ठींनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्या अनुषंगाने पक्षातील ज्येष्ठ मंडळी, माजी मंत्री, माजी शहराध्यक्ष, माजी खासदार व आमदार यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या मार्गदर्शनानंतरच पदभार स्वीकारण्याचे ठरवले आहे.
गेल्या आठवडाभरात उलटसुलट चर्चा झाली असली तरी त्यात काही तथ्य नाही. पक्षातील गटबाजी दूर सारून सर्वांना विश्वासात घेऊनच पदग्रहणाचा कार्यक्रम निश्चित केला आहे. शुक्रवारी दुपारी 2.30 वाजता काँग्रेस कार्यालयात प्रभारी आमदार भाई जगताप, माजी मंत्री विनायकदादा पाटील, सहप्रभारी सचिन साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
नामोल्लेख टाळला
कोणत्या नाराजांना भेटल्या, असा प्रश्न केल्यावर बोरस्ते यांनी माजी मंत्री, माजी शहराध्यक्ष व लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्याचे सांगत त्यांचा नामोल्लेख टाळला. मात्र, प्रेसनोटमध्ये अँड. छाजेड यांच्या कार्यकाळापासून असलेल्या सर्वच नेतेमंडळीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यातील बहुतांश मंडळींनी राष्ट्रीय नेते, प्रभारींच्या उपस्थितीतील कार्यक्रमांकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे पदग्रहण समारंभास ते उपस्थित राहतात की नाही, याकडे लक्ष आहे.