आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता खचल्याने अपघात, विद्यार्थ्यांनी एकत्र येत केला प्रशासनाचा निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंगापूररोड परिसरातील अासारामबापू पूलाजवळचा रस्ता खचून तयार झालेल्या अडीच-तीन फुटांच्या खड्ड्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून अपघात हाेत असूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी (दि. ४) सायंकाळी माजी पोलिस अधीक्षक डाॅ. संजय अपरांती यांच्यासह विद्यार्थ्यांनी निषेध केला.

या रस्त्यावरून रोज वाहतुकीची वर्दळ असते. दोन दिवसांपूर्वी रस्ता खचून तेथे मोठा खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे दहा-पंधरा अपघात घडले आहेत. शुक्रवारी याच ठिकाणी झालेल्या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याअाधी गुरुवारी दाेन विद्यार्थिनीही अपघातात जखमी झाल्या हाेत्या.

त्यामुळे सायंकाळी डाॅ. अपरांती यांच्यासह खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत प्रशासनाच्या कारभाराविरोधात रोष व्यक्त केला. तसेच, अन्य वाहनधारकांना अपघात होऊ नये यासाठी बॅरिकेटिंगही केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांतर्गत नव्याने केलेला रस्ता वर्षभराच्या आतच खचल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.

रस्त्याची दुरुस्ती लवकर करावी
^गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी अपघात घडत असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. प्रज्ञा कर्डक, विद्यार्थिनी

स्टंटबाजी कडेही लक्ष देण्याची गरज
आसारामबापू पुलाजवळ परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थी वेगाने वाहने नेत असतात. या ठिकाणी सर्रासपणे स्टंटबाजीचेही प्रकार घडत असतात. या प्रकारांमुळे अपघातांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढत होत आहे. या प्रकाराकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.

अाधी रस्त्याच्या अवस्थेकडे लक्ष द्यावे
^स्मार्टसिटीचे स्वप्न दाखविणाऱ्या प्रशासनाने रस्त्यांच्या अवस्थेकडे आधी लक्ष दिले पाहिले. - कविता कर्डक, विरोधीपक्षनेत्या, महापालिका

वाहनधारकांच्या जीवावर "खड्डा'
^रस्ताखचल्याने वाहनांच्या अपघातांची मालिका सुरू आहे. येथील पथदीपही बंद असल्याने अपघातात भर पडत आहे. खचलेला रस्ता वाहनधारकांच्या जीवावर बेतत आहे. डॉ. संजय अपरांती, माजीपाेलिस अधीक्षक