आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हिट अँड रन’ प्रकरणी फरार १९ वर्षीय कारचालकास अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कार आपघातातील तीन महिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला फरार कारचालक युवकास पाेलिसांनी अटक केली अाहे. या चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. परवाना नसणे अपघातानंतर पळून गेल्याने त्याच्या विरोधात ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवारी(दि. २६) पहाटे गडकरी चौकात स्कोडा कारने स्विफ्ट डीझायर कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका युवतीसह दोन महिला ठार झाल्या आहेत. 
 
जळगाव येथील भामरे कुटुंबिय सातपूर येथून सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे कुंडली पाहण्यास जात असतांना गडकरी चौकात स्काेडा कार (एमएच ०१ एएल ७९३१)ने स्विफ्ट डीझायर (एमएच १५ डीसी ०५२७)भरधाव वेगात धडक दिल्याने झालेल्या या भीषण आपघातात सरिता भामरे, योगिनी भामरे आणि रेखा पाटील यांचा मृत्यू झाला. लिलाधर भामरे गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर कार चालक फरार झाला. शनिवारी पहाटे संशयित चालक फय्याज फारुख शेख (वय १९, रा. वडाळानाका) यास पोलिसांनी त्याच्या राहात्या घरी अटक केली. शेख विरोधात हिट अंॅड रन आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयिताकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संशयिताच्या वडीलांचे मेडीकल दुकान अाहे. हे प्रकरण दाबण्यासाठी चालकाच्या नातेवाईक मित्र मंडळींकडून पोलिसांवर दबाव टाकला जात होता. मात्र कुठल्याही दबावाला बळी पडात संशयिताला पाेलिसांनी अटक केली. 

सीसीटिव्ही चित्रिकरणातून संशयाताचा माग 
स्कोडाचालकाने पहाटे त्र्यंबकरोडवरील पेट्रोल पंपावर इंधन भरुन गडकरी चौकात येत असल्याचे चित्रिकरण पोलिसांना प्राप्त झाले आहे. या अधारे संशयिताची ओळख पटवून त्याचा वडाळनाका येथे राहत्या घरी पाेलिसांनी अटक केली. 
बातम्या आणखी आहेत...