आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसच्या धडकेने वृद्धा, तर कंटेनरखाली युवक ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अशोकस्तंभ येथून पंचवटीकडे जाणाऱ्या एसटी बसने दिलेल्या धडकेत पायी जाणाऱ्या वृद्धेचा मृत्यू झाला, तर सातपूर येथे कंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हे दाेन्ही अपघात शुक्रवारी दुपारी घडले.
अशोक स्तंभ परिसरात दररोज छोटे-मोठे अपघात हाेत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवदर्शनासाठी घरातून निघालेल्या चंद्रभागा नारायण धात्रक (९०, रा. मल्हारखाण) या अशोक स्तंभावर पोहोचल्यानंतर दुपारी सव्वाबाराच्या सुमारास त्यांच्या पाठीमागून अालेल्या शहर बस (एमएच १५, एके ८०६५)ने धडक दिल्याने धात्रक या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुपारी वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. या अपघातानंतर अशोक स्तंभावरील दररोज होणाऱ्या अपघाताचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अशोक स्तंभ परिसरात अरुंद आणि वळणाचा चढ-उताराचा रस्ता असून, दुचाकी, चारचाकी, अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ या परिसरात असते. दररोज शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांची गर्दी, बसथांब्यांच्या जागी उभ्या असलेल्या रिक्षा अथवा मोकाट जनावरांचा ठिय्या आणि रस्त्यावर बसची वाट पाहणारे प्रवासी अशी अनेक कारणे या परिसरातील अपघाताला जबाबदार ठरत आहेत. अशोक स्तंभ परिसरात एकीकडे नो पार्किंग, तर दुसऱ्या बाजूने असलेल्या क्लासेसमुळे सकाळ-संध्याकाळी येथे वाहनांचा कुंभमेळाच भरतो. या ठिकाणी विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी नागरिक बसची वाट पाहत थांबतात. बऱ्याचदा ही गर्दी रस्त्याच्या मध्यापर्यंत येते. त्यामुळे या मार्गावरील बस स्टॉपजवळ थांबता रस्त्याच्या मध्यभागी थांबते. त्यामुळे मागून येणारी शहर बस किंवा इतर वाहनांना पुढच्या रस्त्यावरील नागरिक वाहने लक्षात येत नाहीत आणि या भागात अपघात होतात. या परिसरात वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
चारही रस्त्यांवर गतिराेधक टाकावेत

^अशोकस्तंभावरील चारही रस्त्यांवर गतिरोधक टाकावेत. परिसरातील सर्कलची रुंदी कमी केल्यास बसमुळे होणारे अपघात होणार नाहीत. श्यामकुलकर्णी, स्थानिक व्यावसायिक

बसचालकाकडून दुर्लक्ष
^चंद्रभागाधात्रक या देवदर्शनासाठी निघाल्या हाेत्या. मात्र, अचानक मागून आलेल्या शहर बसच्या चाकाखाली त्या सापडल्या. बसचालकाच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.- गोरखवाघ, धात्रक यांच्या अाप्त

वाहतूक पोलिस नेमा
^अशोकस्तंभ परिसरात दररोज छोटे-मोठे अपघात घडतात. या परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थी वाहनांवर रायडिंग करतात. त्यामुळे अनेक वेळा अपघात झालेले आहेत. या ठिकाणी दोन वाहतूक पोलिस नेमावेत. -सागर भावसार, स्थानिक

अशी आहेत स्थानिकांची मागणी
{कायमस्वरूपी दाेन वाहतूक पोलिस ठेवावे
{ चारही बाजूने गतिरोधक टाकावे
{ एकेरी मार्गाची कडक अंमलबजावणी करावी
{ रायडिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करावी
{ अशोक स्तंभावरील सर्कलचा अाकार कमी करावा
{ एसटी बससाठी वेगळा मोठा रस्ता द्यावा
{ परिसरात सिग्नल यंत्रणा बसवावी

सर्कलचाही अडथळा
अशोकस्तंभ परिसरात अरुंद रस्ते असल्यामुळे बसला जाण्यास मोठी अडचण निर्माण होते. या परिसरात व‌ळण घेताना दोन बसमध्ये अनेकदा अपघात घडले अाहेत. या परिसरातील सर्कलमुळे शहर बसला वळण घेण्यात मोठा अडथळा निर्माण हाेताे. सर्कलमुळे या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. परिसरातील सर्कल छोटा करून सिग्नल यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी हाेत अाहे.