आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घंटागाडीखाली सापडून चिमुरडीचा अंत, ना हेड लाईट.. ना ब्रेक तरीही घंटागाडी रस्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - शाळेत जाणाऱ्या चिमुरडीचा घंटागाडीच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सिडकोतील तानाजी चौक येथे घडली. या घटनेला जबाबदार असणाऱ्या चालक, ठेकेदार सिडको विभागीय अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी अंबड पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. या प्रकरणी पाेलिसांनी घंटागाडी चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल केला अाहे.
उत्तमनगर येथील अभिनव बालविकास मंदिर या शाळेत इयत्ता तिसरीत शिकणारी नेहा जिजाबराव ठाकरे (९) ही पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जाण्यास निघाली होती. अापल्या मैत्रिणीसोबत ती शाळेत जात असल्याने तिला साेबत घेण्यासाठी जात असताना एक कुत्रा तिच्यावर भुंकला. यामुळे घाबरलेली नेहा रस्त्याने पळाली. पळताना नाल्यावरील जाळीत तिचा पाय अडकला त्याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या घंटागाडीच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने ती चिरडली गेली. या अपघाताचे स्वरूप इतके भीषण हाेते की, मेंदू बाहेर पडून रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने नेहाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने उर्वरित.पान
नेहाठाकरे या शाळकरी मुलीच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घंटागाडीच्या स्थितीने अनेक प्रश्न उपस्थित झाले अाहेत. अतिशय दुरवस्था झालेल्या घंटागाड्या कचरा वाहण्याचे काम करीत असल्याने अपघात घडत असून, ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे निरपराधांचा बळी जात आहे. या अपघातप्रकरणी संबंधित घंटागाडी ठेकेदारावर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली अाहे.

घंटागाडी ठेकेदार चेतन बोरा याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सिडको विभागात ११ प्रभागासाठी १२ घंटागाड्या आहेत. मात्र, सध्या फक्त सहा घंटागाड्या सुरू असून, बाकीच्या गाड्या नादुरुस्त अाहेत. एकीकडे लाखो रुपयांचा ठेका घेणारा ठेकेदार घंटागाड्यांच्या दुरुस्तीकडे पूर्णत: दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र अाहे. या घंटागाड्यांवर काम करणारे कर्मचारी ठेकेदाराचेच असून, त्यांच्याकडून कमी पगारात जास्त काम करून घेतले जात असल्याने तेही व्यवस्थित काम करीत नसल्याच्या तक्रारी अाहेत
मुजोरी कायम...
नेहाच्यामृत्यूला घंटागाडीचा ठेकेदार चेतन बोरा हाच जबाबदार असल्याचा आरोप या वेळी नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी केला. सर्वच घंटागाड्यांची दुरवस्था झाली असून, हा ठेकेदार सुविधाही पुरवत नसल्याचा आरोप होतो आहे. ही घटना घडल्यानंतर बोरा याने घटनास्थळी येणे गरजेचे होते. मात्र, त्याने ते टाळल्याने त्याची मुजोरी पुन्हा समोर आली.

विभागीय स्वच्छता निरीक्षक निलंबित
घंटागाडीमुळेनऊ वर्षीय नेहा ठाकरे हिचा गुरुवारी मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला जबाबदार धरत सिडकाेचे विभागीय स्वच्छता निरीक्षक गाजरे यांना निलंबित करण्याचे अादेश स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिले. स्थायी समितीच्या तब्बल साडेतीन तास चाललेल्या सभेत या प्रकरणावरून खासकरून महिला सदस्या अाक्रमक झाल्या हाेत्या. घंटागाडी ठेकेदारावरही कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली.