आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिहेरी अपघातानंतर महामार्गावर तणाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुंबई-आग्रामहामार्गावर ट्रक, बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या विचित्र अपघातात चार गंभीर जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावरील चौफुल्यांवर सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. जमावास पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात पंधरा ते वीस नागरिक जखमी झाले. शुक्रवारी सकाळी वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात सहायक पोलिस आयुक्तांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी प्रवासी बस (एमएच १५, एके १२४९) अमृतधाम चौफुलीवर वळण घेत असताना उड्डाणपूल उतरून वेगाने धुळ्याकडे जाणाऱ्या ब्रेक फेल झालेल्या ट्रकने (एमपी ०६, केसी ०९६३) धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, ही बस जागेवरच फिरली. नाशिककडे जाणारी दुचाकी (एमएच १५, सीझेड ७९४८) या ट्रकच्या मागील चाकात अडकली. यात पंढरीनाथ डांगे, मारुती टरफले गंभीर जखमी झाले. ट्रकने अमृतधाम बसस्थानकावर उभ्या असलेल्या आरुषी खंदारे, मायावती खंदारे, निकिता खंदारे, रंजना खंदारे या प्रवाशांना धडक दिली. यात दोन मुली गंभीर जखमी झाल्या.

निमसे यांच्याकडून दुपारी घूमजाव
निमसेयांनी सहायक पोलिस आयुक्तांच्या विरोधात पोलिस ठाण्यात थेट तक्रार केली होती. पोलिसांकडून निमसे यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र एका वरिष्ठ निरीक्षकाने आणि काही राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीने निमसे यांनी दुपारी वाजता तक्रारीबाबत घूमजाव केले. मात्र, तक्रार रजिस्टर असताना अशा प्रकारे मागे घेण्यात आल्याने हा नियम इतरांना लागू होणार का, अशी चर्चा पोलिस ठाण्यात सुरू झाली आहे. माघार नेमकी लोकप्रतिनिधींनी घेतली की सहायक पोलिस आयुक्तांनी घेतली, याबाबत मात्र संभ्रम कायम आहे. चव्हाण आणि निमसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांकडून प्रतिसाद मिळाला नाही.

सहायक आयुक्तांवर अदखलपात्र गुन्हा
नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह नागरिक पंचवटी पोलिस ठाण्यात सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आले त्यांनी ठाणे अंमलदार उपनिरीक्षक वर्षाराणी पुंगळे यांच्याकडे तक्रार दाखल करण्याबाबत आग्रह धरला. अखेर पुंगळे यांनी निमसे यांच्या तक्रारीनुसार चव्हाण यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

निमसे यांच्यावर गुन्हा दाखल
आडगावपोलिस ठाण्याचे सुनील साळवे यांना जमावाने बेदम मारहाण केली. साळवे आणि चव्हाण यांच्या तक्रारीनुसार निमसे यांच्यासह चार-पाच संशयितांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.