आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident News In Marathi, Accident In Nashik Issue, Divya Maharashtra

विद्यार्थी अपघातप्रश्नी शिवसेनेचा मोर्चा, विद्यार्थ्यांच्या मृत्यूस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- वाळूने भरलेल्या ट्रकखाली सापडल्यामुळे दोन विद्यार्थ्यांचा बळी गेल्याची घटना शनिवारी (दि. 22) घडली. या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत शिवसेनेतर्फे मंगळवारी अंबड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकर्‍यांतर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आले.

त्रिमूर्ती चौकात मंगळवारी सकाळी शिवसैनिक व नागरिकांनी अपघातातील मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर अंबड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्रिमूर्ती चौकात वाहतूक पोलिस नेमण्याची मागणी करण्यात आली. या वेळी नगरसेविका हर्षा बडगुजर, शिवाजी भोर, सुभाष गायधनी, रमेश उघडे व नागरिक उपस्थित होते.

शिवसैनिकांची श्रद्धांजली
अपघातप्रसंगी शिवसैनिक पंकज जाधव, देवेंद्र शेलार व करमसिंग देवरे हे घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर काही वेळाने तेथे रुग्णवाहिका पोहोचली. दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह या तिघांनी रुग्णवाहिकेत ठेवले. त्या वेळी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष मृत्यू पाहून हेलावलेल्या या तिघांनीही संकेत व मुझफ्फर यांना श्रद्धांजली वाहिली