आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident News In Marathi, Divya Marathi, Nashik, Dhule

ओझरनजीक चार वाहनांच्या अपघातात धुळ्याचे तिघे ठार, नऊ जण जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या हॉटेल सावित्रीसमोर रस्ता ओलांडणार्‍या स्कूटीचालक महिलेस वाचविण्याच्या प्रयत्नात इनोव्हा कार, विरुद्ध दिशेकडून येणार्‍या एक सॅँट्रो आणि दोन अल्टो अशा तीन वाहनांवर धडकल्याने झालेल्या अपघातात सॅँट्रो कारमधील धुळेयेथील एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाले. अपघातात इतर तीन वाहनांतील नऊ जण जखमी झाले आहेत.
सकाळी दहा वाजेच्या दरम्यान झालेल्या या चार वाहनांच्या अपघातात सँट्रो कारमधील डॉ. विनोद मगन वसावे (54), मीनाक्षी विनोद वसावे (50) व केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेला गौरव विनोद वसावे (18, सर्व राहणार फॉरेस्ट कॉलनी, देवपूर, धुळे) हे जागीच ठार झाले. याचबरोबर इनोव्हामधील राजन जोधराज कोचर व प्रमिला राजन कोचर (रा. मुंबई), सीमा कपूरचंद चोप्रा, दिशा कपूरचंद चोप्रा (रा. मुलूंड), इनोव्हा कारचालक घनश्याम र्शीलाल चौधरी, अल्टो कारमधील संजय निंबा शिंदे, अथर्व संजय शिंदे (रा. सटाणा) व दुसर्‍या अल्टो कारमधील महेश नारायण मोरे, लालसिंग सूरजसिंग (रा. कल्याण) हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक बोठे, उमा गवळी, सहायक पोलिस उपनिरीक्षक पोपटराव देवरे यांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताबाबत ओझर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.