आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident News In Marathi, Wani Satapura, Chausale, Divya Marathi

एकाच कुटुंबातील तिघे चौसाळेजवळ ठार,सात जण जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिंडोरी - वणी-सापुतारा मार्गावर चौसाळे येथे गुरुवारी सकाळी 8 वाजता कार व ट्रकमध्ये झालेल्या अपघातात बलसाड येथील एकाच कुटुंबातील तीन ठार, तर सात जण जखमी झाले आहेत. सापुतार्‍याकडे जाणारा आयशर ट्रक (एमएच 14, पीपी 4255) व नाशिककडे येणारी शेवरले कार (जीजे 21, एएच 3715) यांची समोरासमोर धडक झाली. यात कारचालक धीरूभाई बाबूभाई पटेल (40) व बाबूभाई छन्नाभाई पटेल (61) यांचा जागीच मृत्यू झाला. नाशिक येथे उपचारादरम्यान गंभीर जखमी पुष्पाबेन बाबूभाई पटेल (55) यांचा मृत्यू झाला. प्रियांश कल्पेश पटेल (7 महिने), क्रिशा भारतभाई पटेल (6), पिनल कल्पेश पटेल (21), नीरव दयाजी पटेल (24), मित्तल दयाजी पटेल (30), कल्पेश बाबूभाई पटेल (30) व दयाजी छोटूभाई पटेल (55) हे जखमी झाले.