आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-आग्रारोडवर नाशिकजवळील अपघातात एक ठार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी- मुंबई-आग्रारोडवरील बळीमंदिरच्यामागे दुचाकीला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी ठार झाला, तर एक महाविद्यालयीन युवक गंभीर जखमी झाला. गुरुवारी पहाटे हा अपघात घडला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. आडगाव पोलिस ठाण्यात या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पंकज तानाजी भोसले (वय 22, रा. कोणार्कनगर) हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी व येथीलच राहणारा महाविद्यालयीन युवक विक्रमसिंग चव्हाण (वय 17) हे दोघे दुचाकीने (एमएच15 सीडब्ल्यू 5548) नाशिककडे जात असताना बळीमंदिरामागे बोहरा नर्सरीसमोर अज्ञात मालट्रकने पाठीमागून या दुचाकीला धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात भोसले आणि चव्हाण यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. या दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचार सुरू असताना सायंकाळी पंकज भोसले यांचे निधन झाले. दरम्यान, जखमी चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

संचलनासठी जाताना काळाची झडप
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी पंकज भोसले हे 26 जानेवारीनिमित्त संचलनाची तालीम करण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. भोसले हे नुकतेच या विभागात भरती झाले होते. त्यांच्या अपघाती निधनाने विभागासह परिसरात शोककळा पसरली आहे.