आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड-हैदराबाद महामार्गावर नायगावजवळ इनोव्हाची दुभाजकाला धडक; 3 जणांचा मृत्यू, 6 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातग्रस्त वाहन. - Divya Marathi
अपघातग्रस्त वाहन.
नाशिक/नांदेड- नायगावजवळ नांदेड-हैदराबाद मार्गावर नायगावजवळ झालेल्या अपघातात 3 जण ठार झाले आहेत. या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण आंध्र प्रदेशच्या कुर्नूलचे आहेत.
 
नायगावजवळ दुभाजकाला इनोव्हा आदळल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात एका 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. आरूषी रणजितकुमार (वय 7), अनुराधा रणजितकुमार (वय 31) आणि चालक बोईजार्ज क्लिंटन (वय 22) असे या मृतांचे नाव आहे. अपघातातील सर्वजण आंध्रप्रदेशातील कर्नूल येथील रहिवाशी आहेत. अपघात झाल्याचे कळताच गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात हलविले. पण रूग्णालयात पोहोचेपर्यंत तिघांचा मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...