आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदगाव-चाळीसगाव रस्त्यावर व्हॉल्वो बस उलटून 6 जण गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातग्रस्त वाहन. - Divya Marathi
अपघातग्रस्त वाहन.
नाशिक/जळगाव- नांदगाव-चाळीसगाव रस्त्यावर व्हॉल्वो बस उलटून 6 जण गंभीर जखमी झाले. कन्नड घाटात रस्त्याचे काम चालू असल्याने पुणे इंदोर येथून औरंगाबाद चाळीसगावकडे जाणारी प्रवासी व मालवाहतुक नांदगावमार्गे होत आहे. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास इंदोरहून औरंगाबादकडे जाणारी व्हॉल्वो बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने नांदगाव जवळ चाळीसगाव फाट्याजवळील वळणावर उलटली.
 
अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले. जखमी झालेल्यांपैकी तीन जणांना लोणी तालुका वैजापूर येथील रुग्णालयात नेले. दोन महिला  रचना रितेश मेहता ( उज्जैन ) अलका अशोक भिसे ( जालना ) तसेच रविंद्र शंकरराव दिघोळे ( चाळीसगाव ) यांच्यावर नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
 
खिडकी कापून सुटका
अपघातात अशोक भगवान भिसे यांचा हात खिडकीत फसला होता. सकाळी साडेआठ वाजता जेसीबीच्या साहाय्याने खिडकी कापून त्यांची सुटका करण्यात आली. मनमाड 108 येथील रुग्णवाहिकेतून त्यांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता.
बातम्या आणखी आहेत...