आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येवल्याजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; अाठ जण ठार, 15 जण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला- एसटी बस, क्रुझर जीप, मारुती ओम्नी व्हॅन व दुचाकी अशा चार वाहनांच्या विचित्र अपघातात अाठ जण ठार, तर १५ जण जखमी झाले. येवला-मनमाड रस्त्यावरील बाभूळगाव शिवारातील निजधाम अाश्रमासमाेर रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये दाेन बालकांचा समावेश अाहे.  

धुळे-पुणे ही एसटी बस (एमएच ४० एन ९८२१) मनमाडकडून येवल्याकडे जात हाेती. त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रुझर जीपला अाेव्हरटेक करून एक दुचाकी पुढे जाण्याचा प्रयत्न करत हाेती. मात्र या दुचाकीचा बसला धक्का लागला. या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी क्रुझरचालकाने करकचून ब्रेक दाबले. त्याच वेळी या जीपचे टायर फुटले. परिणामी चालकाचे नियंत्रण सुटून ही जीप समाेरून येणाऱ्या अाेम्नी व्हॅनवर धडकली. भरधाव जीपच्या धडकेने अाेम्नी चक्काचूर झाली. त्यातच एसटी बसही या व्हॅनवर धडकली. या अपघातात ८ जण जागीच ठार झाले, तर १५ जण जखमी झाले.  आदित्य बबन मरसाळे (१२, रा. धुळे), महेश दिलीप राव (४२, रा. पाशीपुल, अण्णाभाऊ साठेनगर, धुळे), यश महेश राव (१०), ओम्नीचालक संजय हरी सोनवणे (३२, रा. मनमाड), निशांत मनोज तिवारी (२३, इटावा) यांचा मृतांत समावेश अाहे. इतर तिघांची नावे समजू शकली नाहीत. 

दुचाकीस्वाराकडून अपघाताला निमंत्रण  
कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथून साखरपुड्याचा कार्यक्रम अाटाेपून वराकडील मंडळी क्रुझरने धुळ्याकडे चालली हाेती. या जीपमध्ये १६ ते १७ प्रवासी होते, तर गाडीत जागा नसल्यामुळे भावी नवरदेव दुचाकीवर मित्रासाेबत चालला हाेता. क्रुझरला अाेव्हरटेक करण्याच्या नादात या दुचाकीनेच अपघाताला निमंत्रण दिले. या अपघातात दुचाकी व बसचे काही नुकसान झाले नसले तरी अाेम्नी व्हॅन व क्रुझरमधील प्रवाशांना मात्र प्राण गमवावे लागले
बातम्या आणखी आहेत...