आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Accident Proportion,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महामार्गावरील चौफुल्या अद्यापही दुर्लक्षितच, बेशिस्त वाहनचालकांकडून समस्येत पडतेय भर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महामार्गावरील चौफुल्यांवर होणा-या अपघातांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी सिग्नल यंत्रणेची मागणी अद्यापही प्रतीक्षेतच आहे. परिसरातील नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने या चौफुल्यांवर आता छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत.
अपघात संख्या कमी व्हावी, चौफुल्यांवर वाहनांच्या वेगावर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सिग्नल यंत्रणा, अंडरपास बनविण्यात यावेत, यासाठी परिसरातील नागरिकांनी अनेकदा प्रशासनास निवेदनही दिले. मात्र, केवळ प्रस्ताव विचाराधीन असल्याचेच आश्वासन त्यांना मिळत गेले. याठिकाणी वाढती अपघात संख्या लक्षात घेता प्रशासनाची हतबलता स्पष्टपणे दिसून येते. या प्रकरणी स्थानिकांनी उपोषणही केले. मात्र, रस्ते प्राधिकरणकडून उपोषणकर्त्यांना दोन महिन्यांत मागणी मान्य करण्याचे आश्वासनच मिळाले. हे आश्वासनही हवेतच विरले.
या कालावधीत महामार्गावर छोटे-मोठे मिळून सुमारे ६० अपघात घडले.
यामध्ये १४ जणांचा बळीही गेला. ४० जण गंभीर जखमी झाले. पंचवटी आडगाव पोलिस ठाण्यात रोज किमान एक तरी अपघाताचा गुन्हा दाखल होतो. याकडेदेखील प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. निवडणुकांमध्ये नागरिकांकडून महामार्गावर सुरक्षेसाठी उपाययोजनेची नेहमीच मागणी होते. मात्र, प्रत्येक निवडणुकीत आश्वासनाशिवाय नागरिकांना काहीच मिळत नसल्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या चौफुल्या धोकेदायक...
महामार्गावरील औरंगाबादरोड, के. के. वाघ महाविद्यालय, अमृतधाम, रासबिहारी चौफुली, जत्रा हॉटेल, जुना ओझर जकात नाका या चौफुल्या धोकेदायक ठरत आहेत.

निवेदनाची दखल नाही
रस्ते प्राधिकरण, मनपा, वाहतूक शाखा यांना निवेदन देऊन देखील चौफुल्यांवरील वाहतुकीवर आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाहीत.
रुची कुंभारकर, नगरसेवक, प्रभाग 3