आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाडजवळ भीषण अपघात, चार जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - भरधाव मालट्रकने समाेरून येणा-या कंटेनरला जबर धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात दाेन्ही वाहनांचे चालक, ट्रकचा क्लिनरसह चार जण जागीच ठार झाले तर अन्य दाेेघे गंभीर जखमी झाले अाहेत. हा अपघात मालेगाव - मनमाड राेडवरील चंदनपुरी शिवारात बुधवारी सकाळी ७.३० वाजता घडला. अपघातानंतर सुमारे चार तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. मृतदेह छिन्नविछिन्न झाल्यामुळे मृतदेहांची अाेळख उशिरापर्यं पटली नव्हती.

हरियाणा येथील एक ट्रक लिंबूच्या गाेण्या घेऊन मनमाडहून मालेगावकडे येत हाेता. यावेळी चारचाकी वाहनांची वाहतूक करणारा कंटेनर (एनएल ०२ जी १५४३) मनमाडच्या दिशेने जात हाेता. चंदनपुरी शिवारातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक समाेरून येणा-या कंटेनरवर अादळला. अपघात इतका भीषण हाेता की दाेन्ही वाहनांचा समाेरील भाग अक्षरश: चक्काचूर झाला. दाेन्ही वाहने एकमेकात अडकल्याने ट्रक चालक, क्लिनर व कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर कंटेनरमधील दाेघे गंभीर जखमी झाले अाहे.

अपघातामुळे मनमाड - मालेगाव मार्गावरील वाहतूक चार तास ठप्प झाली हाेती. अपघात इतका भीषण हाेता की मृतदेह छिन्नविछिन्न झाले हाेते. शरीराचे अवयव तुटून पडल्याने मृतदेहांची अाेळख पटविणे अशक्य झाले हाेते. कंटेनरमध्ये सापडलेल्या कागदपत्रांवरून पाेलिसांना मयत कंटेनरचालक अंगदकुमार मूणमूण प्रसाद (वय २४, रा. कानपूर) व जखमी झालेला केशवराय जनार्दन राय (रा. बंगलाेर) यांची अाेळख पटविण्यात यश अाले अाहे. अन्य तिघे मृत व दाेघा जखमींची माहिती मिळलेली नाही. दाेन्ही वाहने परप्रांतीय असल्याने मृत व जखमी देखील परप्रांतीय असण्याची शक्यता पाेलिसांनी व्यक्त केली अाहे. वाहनांच्या क्रमांकावरून मृत व जखमींच्या नातेवाईकांचा शाेध घेण्याचे प्रयत्न सुरू हाेते.

रस्त्यावर लिंबूंचा खच
मालट्रकमध्ये लिंबूच्या गाेण्या असल्याने अपघातामुळे रस्त्यावर लिंबूचा खच निर्माण झाला हाेता. यातील बहुतांश लिंबू फूटून त्याचा रस रस्त्यावर पसरला हाेता. एेन वळणावरच लिंबूंचा खच पडल्याने पाेलिसांनी फावड्याच्या मदतीने सर्व लिंबू जमा करून बाजूला केले. तसेच अन्य वाहने लिंबाच्या रसावरून घसरून नये म्हणून त्यावर माती टाकण्यात अाली.

चार तासाने वाहतूक सुरळीत
अपघातामुळे खाेळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग व किल्ला पाेलिसांना तब्बल चार तास लागले. दाेन्ही वाहने एकमेकात अडकून पडल्याने दाेन क्रेन मागवून ही वाहने बाजूला करण्यात अाली. दाेन्ही बाजूने सुमारे सहा किलाेमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. वाहतूक सुरळीत करताना पाेलिसांची चांगलीच दमछाक झाल्याने अखेर वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी पाेहाेचून सूचना कराव्या लागल्या.