आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारा रुपयांत दोन लाख रुपयांचा अपघाती विमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सर्वसामान्य लोकांची देशाच्या संपत्तीमध्ये गणना व्हावी, तसेच तळागाळातील जनतेचे बँकेमध्ये खाते असावे आणि त्याचा फायदा त्यांना व्हावा, या उद्देशाने ‘पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत बँक खाते उघडण्याच्या उच्चांकानंतर आता विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

भारतातील सर्व लोकांना विम्याचे सुरक्षा कवच मिळावे म्हणून केंद्र सरकारने पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी सकारात्मक पाऊल उचलले असून, जनधन योजनेंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री ज्योती विमा योजना हे दोन अभिनव प्लॅन सादर केले आहे. सुरक्षा विमा योजनेत १२ रुपये वार्षिक प्रीमियम भरून दोन लाख रुपयांचा अपघाती विमा, तर जीवन ज्योती विमा योजनेत ३३० रुपयांत लाख रुपयांचा जीवन विमा काढून घेता येणार आहे. १८ ते ७० वयोगटातील व्यक्ती सुरक्षा विमा योजनेचा, तर १८ ते ५० वयोगटातील व्यक्ती जीवन ज्योती विमा योजनेचे लाभ घेऊ शकणार आहेत. अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आल्यास जीवन विमा योजनेंतर्गत विमा धारकाला दाेन लाख रुपये मिळणार असून, मृत्यू झाल्यास जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत विमाधारकाच्या वारसाला दाेन लाख रुपये मिळणार आहेत.

बचत खात्यांनाच लाभ
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये बचत खाते आवश्यक आहे. प्रीमियमची रक्कम बचत खात्यातून बँकद्वारे ‘ऑटो डेबिट’ सुविधेद्वारे कपात होईल. कोणतीही व्यक्ती एका बचत खात्याद्वारे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार आहे.

महा बँकेचे ५१ हजार उद्दिष्ट
बँक ऑफ महाराष्ट्रने जिल्ह्यात पंतप्रधान सुरक्षा विमा आणि ज्योती विमा योजनेंतर्गत ५१ विमा खाते उघडण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यापैकी दोन हजार सात खाते उघडले आहेत.

पालक मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
जनधन योजनेंतर्गत सादर करण्यात आलेल्या या दोन विमा योजनांचा कोलकाता येथे मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. याच दिवशी नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह राष्ट्रीयकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शुभारंभा पूर्वी २००७ खाते
नाशिकि जल्ह्यात बँक ऑफ महाराष्ट्रने ५१ हजार विमा खाते उघडण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, शुभारंभाच्या आधीच बँकेने २००७ खाते उघडून आघाडी घेतली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या योजनेचा जिल्ह्यात शुभारंभ होणार आहे बी.एम. गिरासे, वरिष्ठ प्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र