आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपुलावर दोन ट्रक आणि चारचाकी वाहनांचा विचित्र अपघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक - वाहन ओलांडताना नियंत्रण सुटल्याने दोन ट्रक चारचाकी वाहनांचा विचित्र अपघात गुरुवारी सकाळी उड्डाणपुलावर झाला. मात्र, केवळ सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही, पण, सर्व वाहनांसह उड्डाणपुलाच्या कठड्याचे मात्र या अपघातामुळे नुकसान झाले. अपघातानंतर काही काळ पोलिसांनी वाहतूक बंद केली होती. औरंगाबाद नाका परिसरात उड्डाणपुलावर ट्रक (एमएच १५, बीजे ५१८८) दुसरा ट्रक (एचआर ५६, ८५६२) यांच्यात धडक झाली. त्याच वेळी मागून येणारे चारचाकी वाहन (एमएच १९, एएन ४४४४) त्यांच्यावर धडकले. या विचित्र अपघातात सर्वच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वेगात असलेले अवजड ट्रक धडकल्याने उड्डाणपुलाचे रॉड तुटून खाली रस्त्यावर पडले. मात्र, केवळ सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.