आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकात होर्डिंगबाजीविरोधात पोलिस यंत्रणेची बाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील प्रमुख चौक, वाहतूक बेट, महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवर होर्डिंगबाजी करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यास महापालिका धजावत नसल्याने अखेरीस पोलिस यंत्रणा होर्डिंग्ज हटविण्यासाठी पुढे सरसावली आहे. वाहतुकीस अडथळा ठरणारे होर्डिंग्ज लावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मोहीम पोलिसांनी गुरुवारी हाती घेतली आहे. यामध्ये गंगापूर आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात होर्डिंग्जबहाद्दरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कॉलेजरोडवरील एचपीटी आणि बीवायके महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर व भोंसला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वाहतूक बेटावर, जेहान सर्कल भागात विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि भाईगिरी करणार्‍यांच्या वाढदिवसांचे होर्डिंग्ज वाहतुकीस अडथळा ठरत आहे. या विरोधात गंगापूर पोलिसांनी होर्डिंग्ज हटविण्याबरोबरच होर्डिंग्जवरील छायाचित्र बघून त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे होर्डिंग्ज लावणार्‍या प्रीतम पिंगळे याच्याविरुद्ध व स्वत:च्या वाढदिवसाचे फलक लावणार्‍या प्रशांत ऊर्फ पप्पूभाई जगताप, स्वप्निल व जुन्या नाशकातील अफजलभाई यांच्याविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरणप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर सारडा सर्कल, द्वारका चौक, गंजमाळ भागात रस्त्यातच आणि वाहतूक बेटावर होर्डिंग्ज लावणार्‍या कॉँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे हनिफ बशीर व फजल शेख यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले. या दोन्ही भागात खुद्द वाहतूक पोलिसांनी पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांची मदत घेत होर्डिंग्ज हटविले.


पालिकेकडून तक्रारीस टाळाटाळ
वाहतूक पोलिस आणि गंगापूर पोलिसांनी कारवाई केली असली तरी या रस्त्यांवर, चौकात आणि मिळेल त्या जागेवर फलक उभे केले जात असले तरी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात नाही. मनपाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांकडून साधी नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रारदेखील दिली जात नसल्याने त्यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे.