आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकावर अत्याचारप्रकरणी अाराेपीस १० वर्षे सक्तमजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अकरा वर्षीय बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या सोमनाथ सुरेश वर्पे (३२) या आरोपीस न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सोमवारी (दि. १७) जिल्हा सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी-फलके यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. अनैसर्गिक अत्याचाराच्या गुन्ह्यात प्रथमच दीर्घ शिक्षा देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
घरातून किरकोळ भांडणावरून घर सोडून मुंबईहून नाशिकला आलेल्या पीडित मुलास नाशिकरोड रेल्वे स्थानकावर जेवणाचे अामिष देत त्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलाने पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्याच दिवशी संशयित वर्पेला अटक केली. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. पंकज चंद्रकोर यांनी सहा साक्षीदार तपासले. घटना निंदनीय असून, समाजाला काळिमा फासणारी आहे. समाजात लहान मुलांवर अत्याचार होण्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करावी, कुठलीही दया दाखवू नये असा युक्तिवाद केला. न्यायालयाने कागदोपत्री पुराव्यानुसार आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी, हजारांचा दंड दंड भरल्यास आणखी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
बातम्या आणखी आहेत...