आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोंदे भवन होणार सहा मजली; वसतिगृहासह हॉस्पिटलही उभारणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शरणपूर रोडवरील सुयश हॉस्पिटलच्या बाजूलाच लागून असलेली आचार्य दोंदे विद्यार्थी भवन नाशिक न्यासची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता पडून आहे. संस्था डबघाईला आली असतानाही या मालमत्तेचा वापर होत नसल्याने अखेर संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी आचार्य दोंदे यांच्या नावाने सुसज्ज असे भवन बांधण्याचा प्रस्ताव रविवारी न्यासाच्या ग्रामसेवक भवनात झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला.

1959 मध्ये दी शिक्षक सहकारी पतपेढीच्या नावाने तत्कालीन अध्यक्ष आचार्य दोंदे यांनी 2 एकर 38 गुंठे या आकाराचा प्लॉट खरेदी केला होता. मात्र, त्यावर बांधलेली इमारत आता मोडकळीस आली असून, तेथून भाड्यापोटी मिळणारे उत्पन्नही अत्यल्प आहे. संस्था अडचणीस असतानाही तीचा उपयोग होत नसल्याने आता या जागेचा विकास करण्याचा निर्णय न्यासाने घेतला आहे. त्यात हेमंत धात्रक या विकासकास या ठिकाणी विकासाचे काम 50-50 टक्के भागीदारीत देण्यात येणार आहे. एकूण जागेच्या 50 टक्के रस्त्याच्या बाजूने बांधकाम केले जाईल.

मधील बाजूस आचार्य दोंदे यांचे स्मारक आणि त्यामागील 50 टक्के भाग विकासकाचा असेल, असा प्रस्ताव तूर्तास ठेवण्यात आला आहे. त्यात भाडेकरूंचा विचार किंवा त्यांच्याबाबतची सर्व जबाबदारी विकासकाची असेल, असेही सांगण्यात आले. या प्रस्तावावर सभेत प्राथमिक चर्चा आणि सभासदांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. आलेल्या हरकतीनंतर सर्वानुमते योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे अध्यक्ष सुभाष आहिरे यांनी सांगितले.