आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसं जोडण्याची कलाच महत्त्वाची : अच्युत गोडबोले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एकवेळ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे सहज शक्य आहे, परंतु माणसं जोडणे मात्र तितकेच कठीण आहे. आजच्या काळात तंत्रज्ञानापेक्षाही माणसं जोडण्याची कला अंगी असणे अत्यंत कठीण आहे, असे प्रतिपादन आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी शनिवारी येथे केले.
सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट आॅफ आॅपरेशन्स मॅनेजमेंट महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दृष्टी 2012’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर बॉश लिमिटेडचे एचआर जनरल मॅनेजर संदीप पांडे, संचालिका डॉ. वंदना सोनवणे, अश्विन सालपेकर आणि विभागप्रमुख यशोमंदिरा खर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. गोडबोले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारताच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्याचबरोबर भावी मॅनेजर्सकरिता या बदलाप्रमाणे स्वत:ला बदलणे किती महत्त्वाचे आहे हेदेखील स्पष्ट केले.
सध्याचे जग हे शेती, व्यवसाय आणि सेवा या तीन परिघांभोवती फिरत असून त्याचे विश्लेषण केले. शेतीच्या युगातून व्यवसायापर्यंतच्या वाटचालीस वेळ लागला, परंतु व्यवसायाकडून सेवांकडे मात्र आपण झटकन वळलो. आताचे युग तर एवढे झपाट्याने बदलते आहे की, दरदिवशी काही नवीन घडामोडी घडत आहेत, बदल हीच गोष्ट सतत घडत आहे. त्यामुळे या काळानुरूप मॅनेजर्सलादेखील बदलावे लागेल, असेही त्यांनी या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.