आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Achyut Godbole News In Marathi, Kimiyagir, Marathi Literature, Divya Marathi

लिखाणासाठी संस्कारांची प्रेरणा,अच्युत गोडबोले यांनी उलगडला लेखन प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आपण शिकत असलेल्या प्रत्येक विषयात नावीन्य शोधून, त्यातील सौंदर्य आत्मसात करण्याचे संस्कार लहानपणापासूनच झाले होते. साहित्य, कला, चित्रकला हे सगळेच विषय तंत्रज्ञानाइतकेच महत्त्वाचे आहेत. कोणत्याही विषयाला कमी न लेखता संपूर्ण न्याय देण्याची शिकवण लिखाणास प्रवृत्त करणारी ठरते, असे प्रतिपादन अच्युत गोडबोले यांनी केले.


रावसाहेब थोरात सभागृह येथे आयोजित भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यातील ‘मान्यवरांची जाहीर व्याख्याने’ या कार्यक्रमात ‘माझा लेखन प्रवास’ या विषयावर संवाद साधताना गोडबोले बोलत होते. श्री जैन सेवा कार्य समिती तसेच, खाबिया ग्रुपच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर देवयानी फरांदे होत्या. ते पुढे म्हणाले की, मी लहान-लहान अनुभवांतून शिकणारा आहे. एखादी गोष्ट आपल्याला येत नाही हा सगळ्यात मोठा अपमान वाटायचा.


प्रामुख्याने जेव्हा ती गोष्ट बुद्धीशी निगडित असेल तेव्हा. या सवयीने अभ्यासाची सवय वाढवली. शैक्षणिक आयुष्यात भेटत गेलेल्या व्यक्ती या प्रवासात अतिशय महत्त्वाच्या ठरल्या. हुशार लोकांचा सातत्याने असलेला सहवास मला उच्च पातळी गाठण्याचं धैर्य देत गेला. व्यक्तींच्या सहवासाने जितकं शिकवलं ते सगळं लेखणीतून उतरवायला सुरुवात केली. सगळ्या विषयांमध्ये इतका रस निर्माण झाला की, याला ‘ज्ञान प्राप्तीचे वेड’ म्हटले जाऊ लागले. हे वेडच मला उच्च पातळीपर्यंत घेऊन आले.


कार्यक्रमास उद्योजक मिलिंद राजपूत, आशिष नहार, गौतम सुराणा, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, निमा संस्थेचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे आदींसह मान्यवर व नाशिककर र्शोते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


नेहमीच शिकत राहा..
पुस्तकं वाचा, अभ्यासावर श्रद्धा ठेवा, आपण ज्ञान आत्मसात करण्यासाठी शिकतो, असे समजण्यापेक्षा कुतुहल जपल्यास ज्ञान हे आपल्या वृद्धीसाठी आहे हे आपोआपच लक्षात येईल. नेहमी शिकत राहिले पाहिजे, तुमच्या प्रगतीसाठी का? या प्रश्नापासून निर्माण होणारा प्रत्येक प्रश्न ज्ञानामृत ठरतो. आपण मिळवलेल्या ज्ञानाचा सार्थ उपयोग करण्यासाठी मी लेखणी हा पर्याय निवडला. आपण समाजाचे देणे लागतो हे लक्षात ठेवून प्रत्येकानेच समाजासाठी आपल्या ज्ञानाचा वापर केला पाहिजे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.


मूल्यांची जपणूक व्हावी..
या व्याख्यानमालेत रविवारी मुंबई येथील रुईया महाविद्यालयाच्या प्राध्यापिका व विचारवंत पु्ष्पा भावे यांनी विचार मांडले. त्या म्हणाल्या, आपल्यासाठी समाजाकडून काय मिळतेय, हे पहाण्यापेक्षा ‘समाजाला आपल्याकडून काय मिळतेय आणि काय मिळणार आहे’ हे महत्त्वाचे आहे. या तत्त्वावर मूल्याधिष्ठित वर्तवणूक अवलंबून असते. मूल्यतत्त्वांची जपणूक करणं म्हणजे मूल्यांची संवेदना जागी ठेवणं आणि मूल्यांचा विवेक जागृत ठेवणं आहे. आपल्या देशात हा अमूल्य विचारांचा पाया पुढे नेलाच जात नाही, हे दुर्दैवच.