आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथालय विकासासाठी वाचकांच्या दृष्टिकोनातून डिजिटलायझेशन आवश्यक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक : आजच्या डिजिटलायझेशनच्या युगात ग्रंथालयांनी आपल्या वाचकांच्या दृष्टिकोनातून डिजिटलायझेशन केले, तर त्यामधून ग्रंथालयांचाही विकास होईल. त्याकरीता डिस्पेस ही ओपन सोर्स प्रणाली ग्रंथालयात मुख्यत्वे अंकीय ग्रंथालय, इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरी तयार करण्यासाठी वापरावी, असे अावाहन पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. सुनीता बर्वे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बीसीयूडी व केटीएचएम महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात अालेल्या दोन दिवसीय ‘डिझाइन अँड डेव्हलपमेंट ऑफ इन्स्टिट्यूशनल रिपॉझीटोरीज युजिंग डिस्पेस’ या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर पुण्याचे गोखले राज्यशास्र व अर्थशास्र संस्थेचे ग्रंथपाल डॉ. नानाजी शेवाळे, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, ग्रंथपाल संजय आहेर उपस्थित होते.
‘डिस्पेस रिपॉझिटोरीज’चे प्रशिक्षण घेतलेल्या ग्रंथपालांना त्यांच्या कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरी तयार करणे सहज शक्य होणार आहे. भविष्यात अनेक संदर्भ ग्रंथ, दुर्मिळ साहित्य संग्रह, तसेच ते वाचक, संशोधक यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी डिस्पेसचा वापर अधिकाधिक ग्रंथालयांनी करावा, असे आवाहनही यावेळी डॉ बर्वे यांनी केले.

नाशिकमध्ये प्रथमच होणाऱ्या या ग्रंथालयाच्या ‘डिस्पेस रिपॉझिटोरीज’ राज्यस्तरीय कार्यशाळेतून तज्ज्ञांच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला ग्रंथालय समृद्धीसाठी करता येईल, या विषयाच्या अनुषंगाने ग्रंथालय विकास होऊन डिजिटलायझेशनच्या युगात वाचकांपर्यंत पोहचता येईल. या कार्यशाळेचा निश्चितच लाभ झाला असेल, असे प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
राज्यातून ७० ग्रंथपालांचा सहभाग
या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत सहभागी झालेल्या ग्रंथपालांना संगणकावर डिस्पेस रिपॉझिटरीजचे तांत्रिक प्रशिक्षण डॉ. सुनीता बर्वे व डॉ. नानाजी शेवाळे यांनी दिले. कार्यशाळेसाठी नाशिकसह महाराष्ट्रातून ७० ग्रंथपाल सहभागी झाले होते. कार्यशाळेसाठी सहाय्यक ग्रंथपाल अनिल पाटील यांच्यासह प्राध्यापक व ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
बातम्या आणखी आहेत...