आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ऑलआउट’मध्ये २४० टवाळखोरांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या आदेशान्वये शहरात अचानक कोम्बिंग आणि ‘ऑलआउट’ कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान सुमारे २४० टवाळखोरांवर कारवाई करण्यात अाली. रेकॉर्डवरील १५८ गुन्हेगारांची तपासणी करण्यात अाली तसेच बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

गेल्या दोन महिन्यांत आठ खुनांच्या घटना घडल्याने पोलिस आयुक्तांनी टवाळखोरांना लक्ष्य केले अाहे. बुधवारी कोम्बिंग आणि ऑलआऊट कारवाईदरम्यान २४० टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिस अॅक्ट अंतर्गत ३४ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. मद्य प्राशन करून वाहने चालवणाऱ्या सहा चालकांवर कारवाई करण्यात आली. वाहनांची कागदपत्रे जवळ बाळगणाऱ्या २०१ चालकांवर कारवाई करण्यात आली. तडीपार गुन्हेगारास कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान अटक करण्यात आली. पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.
यांचाकारवाईत सहभाग : पोलिसआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, ११ वरिष्ठ निरीक्षक, ३० अधिकारी, १२० कर्मचारी यांनी कारवाईत सहभाग घेतला.

अशीझाली कारवाई :टवाळखोर- २४०, प्रतिबंधक कारवाई- ३४, मद्य पिऊन वाहने चालविणे- ६, मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई- २०१, रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकिंग- १५८, तडीपार गुन्हेगारावर कारवाई - १.

नागरिकांनी सहकार्य करावे
शहरातअचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे. नागरिकांना या कारवाईचा काही प्रमाणात त्रास होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पोलिस दलास सहकार्य करावे. -एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त, नाशिक
बातम्या आणखी आहेत...