आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टागाेरनगरला भर पावसात निदर्शने, दारू दुकानाला विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचवटी - दिंडोरीरोडवरील झालेले दारू दुकान बंद करण्याच्यासाठी परिसरातील महिलांनी रविवारी (दि. १६) सकाळी या दुकानासमाेर थाळीनाद अांदाेलन केले. शनिवारी सायंकाळी परिसरातील सुमारे शंभर महिलांनी या दुकानासमाेर ठिय्या अांदाेलन केले हाेते. 
दिंडोरोडवरील अमित वाईन या बंद झालेल्या दारू दुकानाचे शटर पुन्हा उघडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. दारू दुकानास नागरिकांचा हाेणारा विराेध लक्षात घेत या दुकानचालकाने काही काळ दुकान बंद ठेवले मात्र विराेध मावळताच दुकान पुन्हा सुरू केल्याने महिलांनी रुद्रावतार धारण करत या दुकानासमाेर अांदाेलन केले. दुकानाचे शटरही डाऊन केले होते. रविवारी सकाळी पुन्हा दुकान सुरु झाल्याने महिलांनी थाळीनाद आंदोलन केले. पोलिस आणि प्रशासनावर महिलांना आरोप करत घोषणाबाजी केली. या आंदोलनात दीडशे महिला सहभागी झाल्या हाेत्या. पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला होता. 
 
श्रीश्री रविशंकर मार्गावरील दारू दुकानाविरोधात परिसरातील महिला आक्रमक झाल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत दारू दुकान सुरू होऊ देण्याचा निर्धार करत या दुकानासमोर महिला आंदोलन करत आहेत. रविवारी (दि. १५) भरपावसात या दुकानासमोर महिलांनी निदर्शने केली. दारू दुकान सुरू करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न मात्र परिसरातील महिलांनी हाणून पाडला. 

टागोरनगर परिसरातील महादेव पार्क या इमारतीत महारानी वाइन्स नावाने दारू दुकान सुरू करण्यात आले आहे. मात्र या दुकानांमुळे परिसरातील नागरिक, महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. रहिवासी भागातील हे दारू दुकान महिलांनी आंदोलन करत शुक्रवारी सायंकाळी बंद पाडले. कोणत्याही परिस्थितीत दुकान सुरू होऊ देण्याचा निर्धार व्यक्त करत या दुकानासमोर निदर्शने करत आहे. रविवारी भर पावसात आंदोलन करण्यात आले. 

दरम्यान, दुकान सुरू करण्यासाठी काही कर्मचारी आले असता महिलांनी या कर्मचाऱ्यांना हुसकावून लावले. कोणत्याही परिस्थितीत रहिवाशी भागातील दारू दुकान सुरू होऊ देण्याबाबत निर्धार व्यक्त करण्यात आला. दीप्ती गायकवाड, महामंडलेश्वर दीपानंद सरस्वती यांच्यासह परिसरातील महिला यावेळी उपस्थित होत्या.