आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनचालकांवरील कारवाई; पाच लाख रुपयांचा दंड वसूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहर वाहतूक शाखेने शहर आणि परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर केलेल्या दंडात्मक कारवाईत दहा महिन्यांत तब्बल एक कोटी दाेन लाख रुपये वसूल करण्यात अाले. दंडात्मक कारवाईने दिवाळीमध्ये महसुलात वाढ झाल्याचे दिसून येत अाहे. शहरात सीटबेल्ट आणि हेल्मेट वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा धडाका सुरू आहे.

शहर वाहतूक शाखेने विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत कोटीचा दंड वसूल केला. सिंहस्थानंतर शहरातील बिघडलेली वाहतूक व्यवस्था सुधारण्याचे मोठे आव्हान पोलिस दलासमोर निर्माण झाल्याने कारवाई तीव्र स्वरूपात होत आहे. जानेवारी ते १३ नोव्हेंबरपर्यंत वाहतूक शाखेने ९७ हजार २५० वाहनचालकांवर कारवाई केली. यामध्ये प्रामुख्याने ट्रीपल सीट, वाहन परवाना जवळ बाळगणे, गणवेश परिधान करणे, खासगी वाहनात प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे, फ्रंटसीट अादी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. दिवाळीमध्ये वाहतूक विभागाने सर्वाधिक कारवाई करीत महसुलात वाढ केली. सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांत सुमारे पाच लाखांचा दंड वसूल करण्यात अाल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.