आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्र बाळगणार्‍यांवर कारवाईचा धडाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात विविध भागात पोलिस पथकांनी गस्त घालताना दहा जणांना शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. अटक झालेल्यांकडून त्यांच्याकडून प्राणघातक शस्त्र जमा करण्यात आले. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत सुमारे 30 जणांवर प्रतिबंधक कारवाई करणात आली आहे.

नाशिक शहरात पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करून शोधमोहीम हाती घेतली आहे. प्रवीण पगारे, रामचंद्र कांबळे, रावसाहेब वाणी, शेख शहनवाज, मोहम्मद शेख, अमोल पोटे, दीपक चोथे यांना पंचवटी, सरकारवाडा, भद्रकाली, आणि गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली. त्यांच्याकडून प्राणघातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली असून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून, त्यांना अटक करण्यात आली.

तीन दिवसांत सुमारे 30 जणांवर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. यामध्ये काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सहायक आयुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले.