आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनापरवानगी हाेर्डिंग लागल्यास थेट गुन्हा, अादर्श अाचारसंहितेची तयारी सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीची अाचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अतिक्रमण विविध कर विभागाने डाेळ्यांत तेल घालून लक्ष ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, विनापरवानगी हाेर्डिंग लावल्यास थेट फाैजदारी कारवाई केली जाणार असल्याचे उपायुक्त राेहिदास बहिरम यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर शहरात अादर्श अाचारसंहिता लागू झाली अाहे. तसे पाहिले तर यापूर्वीच उच्च न्यायालयाच्या निकालानुसार शहरात अनधिकृत हाेर्डिंग्ज, पाेस्टर्स वा फलक लागल्यास थेट फाैजदारी कारवाई करण्याचे अादेश दिले अाहेत. 
 
मात्र, त्याकडे महापालिकेकडूनच कानाडाेळा हाेत हाेता. त्यामुळे हाेर्डिंग्जद्वारे शहर विद्रुपीकरणाचे प्रकार सर्रास सुरू हाेते. अलीकडेच तर राजकीय कार्यक्रमानिमित्ताने शहर अक्षरशः हाेर्डिंगच्या गराड्यात सापडूनही कारवाई हाेत नव्हती. मात्र, महापालिका निवडणुकीची अाचारसंहिता सुरू झाल्यावर प्रशासनाने हाेर्डिंगची बाब गांभीर्याने घेतली अाहे. पालिकेने सहाही विभागीय अधिकाऱ्यांना हाेर्डिंग वा अन्य माध्यमातून हाेणाऱ्या अनधिकृत प्रचाराकडे लक्ष ठेवण्याचे अादेश दिले अाहेत. अनधिकृत हाेर्डिंग लागल्यास त्याचे व्हिडिअाे चित्रीकरण करून थेट गुन्हे दाखल केले जाणार अाहेत. 

अाचारसंहिता सेलही हाेणार सुरू 
महापालिका निवडणुकीसाठी अाचारसंहिता कक्ष सुरू हाेणार असून, ४६ दिवसांत शहरात काेणती उद‌्घाटने हाेणार नाही वा अाचारसंहितेचा भंग हाेणार नाही, यादृष्टीने या कक्षातील अधिकारी कर्मचारी लक्ष ठेवून असतील. 

राजकीय पक्षांच्या शाखा फलकांकडे लक्ष 
राजकीय पक्षांच्या शाखा, विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी असलेल्या काेनशिला अन्य प्रचार हाेईल अशी शिल्पे झाकली जाणार अाहेत. संबंधित पक्ष अथवा पदाधिकाऱ्यांनी प्रचार हाेणार नाही याची तजवीज केल्यास महापालिका कारवाई करणार अाहे.